रातसें डर लगता हैं साब! सिनेमामध्ये खतरनाक स्टंट करणाऱ्या 'या' अभिनेत्याला एकटं झोपायची वाटते भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:25 PM2023-03-02T15:25:21+5:302023-03-02T15:26:04+5:30

Tiger shroff: हा अभिनेता कधीच रात्री एकटा झोपत नाही. सेटवरही रात्रीच्या वेळी तो एकटा झोपत नाही.

tiger shroff birthday special unknown facts related to his life | रातसें डर लगता हैं साब! सिनेमामध्ये खतरनाक स्टंट करणाऱ्या 'या' अभिनेत्याला एकटं झोपायची वाटते भीती

रातसें डर लगता हैं साब! सिनेमामध्ये खतरनाक स्टंट करणाऱ्या 'या' अभिनेत्याला एकटं झोपायची वाटते भीती

googlenewsNext

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती ही वाटतच असते. कोणाला उंच कड्याची वाटते, कोणाला पाण्याची तर कोणाला आगीची. पण, बॉलिवूडमधल्या एका लोकप्रिय अभिनेत्याला चक्क रात्री एकटं झोपायची भीती वाटते. त्यामुळेच हा अभिनेता आजही रात्री कधीच एकटा झोपत नाही.

फिटनेस फ्रिक, जबरदस्त स्टंट आणि उत्तम अभिनयकौशल्य यांच्यामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ.  १९९० साली जन्म झालेल्या टायगरची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. त्यामुळेच हिरोपंती या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर त्याचा फॅनफॉलोअर्स कमालीचा वाढला. म्हणूनच, टायगरविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 

टायगरला वाटते रात्री एकटं झोपायची भीती

मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेल्या टायगरला रात्री एकट्याला झोपायची प्रचंड भीती वाटते. केवळ रात्रीच नाही तर त्याला साप, विंचू यासारख्या प्राण्यांचीही भीती वाटते. करण जोहरच्या चॅट शोमध्ये त्याने नुकताच या विषयी खुलासा केला आहे.

"एकदा मी एक हॉरर चित्रपट पाहिला होता. तेव्हापासून मला रात्री एकटं झोपायची खूप भीती वाटते. मी घरी एकटा कधीच झोपत नाही. अजूनही मी माझ्या आईसोबत झोपतो. आणि, शूटसाठी बाहेर असेन तर मग टीमपैकी कोणाला तरी माझ्यासोबत रुम शेअर करायला सांगतो", असं टायगर म्हणाला.

दरम्यान, टायगर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. टायगरने हिरोपंती या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो 'बागी', 'बागी 2', 'स्टुडंट ऑफ द इअर 2', 'वॉर' या चित्रपटांमध्ये झळकला आहे.
 

Web Title: tiger shroff birthday special unknown facts related to his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.