Tiger 3 : सलमानच्या 'टायगर ३'ने पहिल्याच दिवशी मोडला 'गदर २'चा रेकॉर्ड, कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 08:30 AM2023-11-13T08:30:49+5:302023-11-13T08:31:30+5:30

'टायगर ३' चा बॉक्स ऑफिसवर धुव्वा, पहिल्याच दिवशी मोडला 'गदर २'चा रेकॉर्ड

tiger 3 box office collection day 1 salman khan katrina kaif movie break gadar 2 opening day record | Tiger 3 : सलमानच्या 'टायगर ३'ने पहिल्याच दिवशी मोडला 'गदर २'चा रेकॉर्ड, कमावले 'इतके' कोटी

Tiger 3 : सलमानच्या 'टायगर ३'ने पहिल्याच दिवशी मोडला 'गदर २'चा रेकॉर्ड, कमावले 'इतके' कोटी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा 'टायगर ३' प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल ६ वर्षांनी टायगर सिनेमाचा सिक्वेल आल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अखेर १२ नोव्हेंबरला 'टायगर ३' प्रदर्शित झाला. सलमानच्या 'टायगर ३' ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सनी देओलच्या 'गदर २'चा रेकॉर्ड मोडला आहे. 

'टायगर ३'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशी 'टायगर ३' सिनेमा ४० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज होता. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधूनही कोटींची तिकिटे विकिली गेली होती. दिवाळीचा पहिला दिवस असूनही हा चित्रपट पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांनी सिनेमागृहांत गर्दी केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार सलमानच्या 'टायगर ३' ने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल ४४.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'टायगर ३'च्या हिंदी व्हर्जनने ४३.२ कोटी तर तेलुगु व्हर्जनने १.१५ कोटींची कमाई केली. तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या व्हर्जनने १५ लाख रुपयांची कमाई केली आहे. 


 
सलमानच्या 'टायगर ३'ने पहिल्याच दिवशी 'गदर २'चा रेकॉर्ड मोडला आहे. सनी देओलच्या 'गदर २'ने प्रदर्शनाच्या दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला होता. तर 'टायगर ३'ने ४४ कोटींचा आकडा पार करत 'गदर २' चा रेकॉर्ड मोडला. आता हा चित्रपट लवकरच 'जवान', 'पठाण' या चित्रपटांचे रेकॉर्ड लवकरच ब्रेक करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असलेल्या 'टायगर ३' सिनेमात इमरान हाशमी, रिधी डोगरा, आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मनिष शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३०० कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Web Title: tiger 3 box office collection day 1 salman khan katrina kaif movie break gadar 2 opening day record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.