वडिलांच्या कडेवर असलेली ही चिमुकली आहे आज टॉप अॅक्ट्रेस;तुम्ही ओळखलं का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 17:43 IST2022-02-13T17:42:51+5:302022-02-13T17:43:35+5:30
Bollywood actress: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चिमुकलीचा फोटो काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वडिलांच्या कडेवर असलेली ही चिमुकली आहे आज टॉप अॅक्ट्रेस;तुम्ही ओळखलं का तिला?
बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यात चित्रपट आणि झगमगाट यांच्या व्यतिरिक्त काय घडतं, त्यांची पर्सनल लाइफ या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यात अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील माहितीदेखील शेअर करत असतात. कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या कुटुंबाचे वा स्वत: च्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. ही चिमुकली आज लोकप्रिय अभिनेत्री असल्याचं दिसून येतं.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चिमुकलीचा फोटो काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणीमध्ये तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ही अभिनेत्री वडिलांच्या कडेवर बसल्याचं पाहायला मिळत आहे.
कोण आहे ही अभिनेत्री?
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणारी ही लहान मुलगी अभिनेत्री रवीना टंडन आहे. काही दिवसांपूर्वीच रवीनाच्या वडिलांचं निधन झालं. यावेळी रवीनाने वडिलांसोबतचे काही फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. रवीनाच्या वडिलांचं नाव रवी टंडन असं असून बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वातील प्रत्येकालाच धक्का बसला आहे.