हृतिकसोबत झळकलेला 'हा' चिमुकला आज त्यालाच देतोय टक्कर; तुम्ही ओळखलं का त्याला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:00 IST2022-08-24T13:00:00+5:302022-08-24T13:00:00+5:30
करिअरच्या सुरुवातीला या अभिनेत्याला बराच स्ट्रगल करावा लागला. मात्र, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं.

हृतिकसोबत झळकलेला 'हा' चिमुकला आज त्यालाच देतोय टक्कर; तुम्ही ओळखलं का त्याला?
सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टींची चर्चा होत असते. यात खासकरुन सेलिब्रिटींचे व्हिडीओ, फोटो तर कायम चर्चेत येत असतात. सध्या अशाच एका चिमुकल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा चिमुकला अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा लहानगा कोणी साधासुधा मुलगा नसून आज तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
सध्या सोशल मीडियावर हृतिकचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत दोन लहान मुलं दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या दोन लहानग्यांपैकी एक लहान मुलगा आज बॉलिवूडमधील सुपरस्टार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये हृतिकसोबत असलेला मुलगा अभिनेता विकी कौशल आहे. 'मसान', 'राज़ी','उरी: द सर्जिकल स्ट्राइक' अशा काही सुपरहिट चित्रपटांमधून विकीने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांच्या यादीत त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
दरम्यान, करिअरच्या सुरुवातीला विकीलादेखील बराच स्ट्रगल करावा लागला. मात्र, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच विकीने अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली आहे.