'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारणही आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:08 IST2024-04-08T13:06:13+5:302024-04-08T13:08:50+5:30
अजय देवगणचा मैदान आणि अक्षय कुमारच्या बडे मिया छोटे मियाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. कारण जाणून घ्या (Maidaan, bade miyan chhote miyan)

'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारणही आलं समोर
गेल्या अनेक दिवसांपासून अजय देवगणच्या 'मैदान' आणि अक्षय कुमार - टायगर श्रॉफच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमांची चर्चा आहे. 'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा एकमेकांना भिडणार होते. दोन्हीही सिनेमांची रिलीज डेट एकाच दिवशी होती. परंतु नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार 'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' या दोन्ही बिग बजेट सिनेमांची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा ईदच्या खास दिवशी अर्थात बुधवारी १० एप्रिलला रिलीज होणार होते. यामागचं कारण म्हणजे ईदचा चंद्र गुरुवारी ११ एप्रिलला दिसणार आहे. या कारणाने दोन्ही सिनेमांच्या मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट एक दिवस पुढे ढकलली आहे. त्यामुळे 'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' हे दोन्ही सिनेमे ११ एप्रिलला रिलीज होणार आहे. १० एप्रिलला फक्त मर्यादित थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Looks like 10th April will now have limited shows as ‘paid previews’ for both #BMCM & #Maidaan and 11th April will be the actual release date.
— Nishit Shaw (@NishitShawHere) April 7, 2024
Your opinion on this move?
'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' सिनेमांबद्दल सांगायचं तर.. 'मैदान' हा अजय देवगणचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रोजेक्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'मैदान' सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. या सिनेमात अजयसोबत अभिनेत्री प्रियामणी झळकणार आहे. तर दुसरीकडे 'बडे मिया छोटे मिया' हा बिग बजेट सिनेमात असून सिनेमात अक्षय कुमार-टायगर श्रॉफ-पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत आहेत.