"शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:33 IST2025-05-13T16:32:29+5:302025-05-13T16:33:15+5:30

Vicky Kaushal : अनेक बॉलिवूड स्टार्सनंतर विकी कौशलने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय सैन्याचे आभार मानले.

"The path to peace also goes through strength", Vicky Kaushal praises the Indian Army | "शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक

"शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो", विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)द्वारे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला होता. अशा परिस्थितीत आपल्या सैन्याने प्रत्येक क्षणी देशाचे रक्षण केले. अनेक बॉलिवूड स्टार्सनंतर विकी कौशल(Vicky Kaushal)ने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय सैन्याचे आभार मानले. 

अभिनेत्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केला आहे. त्यातील एका फोटोत एक जवान हनुमानाचा आशीर्वाद घेताना दिसतो आहे आणि दुसऱ्या फोटोत विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत लिहिले की, "शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो.आपल्या भारतीय सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याला आणि अचूकतेला सलाम. आपल्या खऱ्या नायकांबद्दल आपल्या हृदयात असलेल्या कृतज्ञता आणि अभिमानाचे शब्दात वर्णन करता येणार नाही. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. जय हिंद." #ऑपरेशनसिंदूर #ऑपरेशनकेलर


विकीने साकारलीय जवानाची भूमिका
विकी कौशलला खरी प्रसिद्धी 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तो एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. त्याचे काम आणि चित्रपट दोन्ही प्रेक्षकांना खूप आवडले. याशिवाय, त्याने 'सॅम बहादूर'मध्ये आर्मी ऑफिसरची भूमिका देखील साकारली आहे. हा अभिनेता शेवटचा 'छावा' चित्रपटात दिसला होता. जो ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.

Web Title: "The path to peace also goes through strength", Vicky Kaushal praises the Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.