'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माची वैयक्तिक माहिती लीक, फोन नंबरही व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:44 PM2023-05-25T12:44:15+5:302023-05-25T12:48:44+5:30

एका सोशल मीडिया युझरने तिची वैयक्तिक माहिती लीक केल्याची घटना घडली आहे.

the kerala story fame adah sharma personal details viral got threats to leak mobile no also | 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माची वैयक्तिक माहिती लीक, फोन नंबरही व्हायरल करण्याची धमकी

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माची वैयक्तिक माहिती लीक, फोन नंबरही व्हायरल करण्याची धमकी

googlenewsNext

सध्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाची आणि त्यातील कलाकारांची चर्चा आहे. सिनेमाला अनेकांनी विरोध केला असून कलाकारांना धमकीचे मेसेजही आले आहेत. दरम्यान अभिनेत्री अदा शर्माच्या (Adah Sharma) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका सोशल मीडिया युझरने तिची वैयक्तिक माहिती लीक केल्याची घटना घडली आहे. तसंच तिला धमकीही आली आहे.

अभिनेत्री अदा शर्माने सिनेमा शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे. केरळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं पात्र तिने केलं आहे. सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून मुली लव्हजिहादच्या कशा शिकार होतात आणि नंतर ISIS च्या मार्गाला लागतात हे दाखवलं आहे. दरम्यान अनेकांनी सिनेमाला विरोध केला आहे. तसंच कलाकारांना धमकीही मिळत आहे. अभिनेत्री अदा शर्माची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचीही घटना घडली आहे. एका इन्स्टाग्राम युझरने ही माहिती ऑनलाईन लीक केली आहे.  तसंच तिचा फोन नंबर लीक करण्याची धमकीही देण्यात आली आहे. या युझरचं अकाऊंट आता डिअॅक्टिव्ह दिसत आहे. 'ही कथा दाखवून चांगलं काम केलं नाही' असा मेसेजही त्याने केला.याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अदा शर्माला मिळत असलेल्या या धमक्यांनंतर कारवाई सुरु झाली आहे. तिच्या चाहत्यांनीही संबंधित युझरविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या 'द केरळ स्टोरी' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तसंच अदाचं खूप कौतुक होतंय. तिच्या चाहतेवर्गातही वाढ झाली आहे.

Web Title: the kerala story fame adah sharma personal details viral got threats to leak mobile no also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.