'थामा'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! हॉरर-कॉमेडी सिनेमाची प्रेक्षकांना भुरळ, कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:25 IST2025-10-27T11:18:09+5:302025-10-27T11:25:43+5:30
बॉक्स ऑफिसवर 'थामा' सुस्साट! १०० कोटींकडे वाटचाल; हॉरर-कॉमेडी सिनेमाची पडद्यावर जादू

'थामा'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! हॉरर-कॉमेडी सिनेमाची प्रेक्षकांना भुरळ, कमावले इतके कोटी
Thama Box Office Collection Day 6: २०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरलं आहे,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकी कौशलचा छावा तसेच सैयारा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल करत कोट्यवधींची कमाई केली. या यादीमध्ये आता आणखी एका सिनेमाचा समावेश झाला असून अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींकडे वाटचाल केली आहे. या चित्रपटाचं नाव म्हणजे थामा.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित थामा हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
'थामा'चित्रपटात आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना नवाजुद्दीन सिद्धिकी, परेश रावल, सत्यराज, गीता अग्रवाल अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा बहुचर्चित चित्रपट २१ ऑक्टोबरला रिलीज झाला. केवळ रीलिजच्या दिवशी या चित्रपटाने कोटींमध्ये कमाई केली आणि त्यानंतर कोट्यवधींची घोडदौड सुरू आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आयुषमान खुरानाच्या या सिनेमाची २४ लाख रुपये कमाई केली होती.दुसऱ्या दिवशी १८.६ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी १३ कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी १० कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी चित्रपटाची कमाई पुन्हा १३ कोटी रुपयांवर पोहोचली.यानंतर 'पहिल्या मंडे टेस्ट' मध्येही हा सिनेमा उत्तीर्ण झाला आणि ११.५५ कोटी रुपये कमाई करत आपला दबदबा निर्माण केला आहे. एकंदरीत हे चित्र पाहता चित्रपट लवकरच १०० कोटींच्या घरात पोहोचेल,असे अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या चित्रपटाचं एकूण ९०.२५ कोटी रुपये इतकं कलेक्शन झालं आहे.