"तीस मार खान फ्लॉप सिनेमा"; नेटकऱ्याची प्रतिक्रिया, दिग्दर्शक फराह खानचा संताप, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:38 IST2025-10-06T17:35:50+5:302025-10-06T17:38:12+5:30
फराह खान दिग्दर्शित तीस मार खान हा फ्लॉप सिनेमा आहे, असं एक युजर म्हणाला. त्यावर फराहने दिलेलं उत्तर चर्चेत आहे

"तीस मार खान फ्लॉप सिनेमा"; नेटकऱ्याची प्रतिक्रिया, दिग्दर्शक फराह खानचा संताप, म्हणाली-
कोरिओग्राफर फराह खानने (Farah Khan) तिच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'तीस मार खान' (Tees Maar Khan) चित्रपटाला फ्लॉप म्हणणाऱ्या एका सोशल मीडिया युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. फराह खाननेअक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. फराहने नेटकऱ्याची बोलती चांगलीच बंद केली आहे. काय म्हणाली फराह? जाणून घ्या.
फराह खानने नेटकऱ्याला दिलं प्रत्युत्तर
एका सोशल मीडिया युजरने 'तीस मार खान'मधील एक सीन शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "एक फ्लॉप चित्रपट जो मला मनापासून आवडतो." या पोस्टवर प्रतिक्रिया देताना फराह खानने लगेच कमेंट करत युजरला उत्तर देत लिहिलं की, "तुमच्या माहितीसाठी सांगते की, या चित्रपटाने ६० कोटी रुपये कमावले होते. फ्लॉप नाही... पण हा चित्रपट पूर्ण नुकसान होण्यापासून थोडा दूर होता." फराह खानची ही रिअॅक्शन आता रेडिटवर व्हायरल होत आहे. फराहचे चाहतेही तिचं समर्थन करत आहेत.
एका युजरने कमेंट केली, "हिट असो वा फ्लॉप, 'शीला की जवानी' हे गाणं सर्वात बेस्ट आहे!" दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "हा चित्रपट आजच्या कॉमेडी चित्रपटांपेक्षा शंभर पटीने चांगला आहे."
चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
फराह खान दिग्दर्शित, शिरीष कुंदर व ट्विंकल खन्ना निर्मित 'तीस मार खान' हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमारने यात तबरेज मिर्झा खान या धूर्त चोराची भूमिका साकारली होती. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी, हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटमध्ये जगभरात सुमारे १०० कोटी रुपये कमावण्यात यशस्वी ठरला होता. या चित्रपटातील 'शीला की जवानी' हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले होते.