'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:55 IST2025-01-30T13:54:53+5:302025-01-30T13:55:24+5:30
'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात छ.संभाजी महाराज आणि येसूबाईचं नातं बघायला मिळतं (chhaava movie)

'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत
'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना या कलाकारांची 'छावा'मध्ये प्रमुख भूमिका आहे. 'छावा' सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कलाकारांच्या अभिनयाचंही सगळीकडे कौतुक होतंय. अशातच 'छावा' सिनेमातील पहिलं गाणं भेटीला येणार आहे. या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'छावा' सिनेमातील पहिलं गाणंं
ए. आर. रहमान यांचं संगीत, इर्शाद कामिल यांचे शब्द आणि अरिजीत सिंग यांचा आवाज असलेलं 'छावा' सिनेमातील 'जाने तू' या गाण्याची झलक आज प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यातील प्रेमळ नातं बघायला मिळतं. गाण्याची झलक रिलीज होताच नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. रश्मिका मंदाना आणि विकी कौशल यांच्यातील केमिस्ट्रीही सर्वांना आवडलेली दिसतेय. संपूर्ण गाणं उद्या रिलीज होणार आहे.
'छावा'ची उत्कंठा शिगेला
विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळणार आहे. ए.आर.रहमान यांनी सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे तर लक्ष्मण उतेकरांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय.