'अजेय' सिनेमाचा टीझर रिलीज, योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेत झळकतोय 'हा' अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:02 IST2025-03-26T15:59:30+5:302025-03-26T16:02:02+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बायोपिक येत असून हा अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार आहे

'अजेय' सिनेमाचा टीझर रिलीज, योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेत झळकतोय 'हा' अभिनेता
योगी आदित्यनाथ (yogi adityanath) हे भारतीय राजकारणातील महत्वाचं नाव. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्यावर बायोपिक येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. या बायोपिकमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेत कोण झळकणार हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात होतं. अखेर याविषयी खुलासा झाला आहे. कारण योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकचा टीझर रिलीज झालाय.
हा अभिनेता साकारतोय योगी आदित्यनाथ यांची भूमिका
योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावरील बायोपिकचं नाव आहे 'अजेय'. '१२th फेल' फेम अभिनेता अनंत जोशी या सिनेमात योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अनंत जोशीचा जबरदस्त लूक टीझरमध्ये पाहायला मिळतोय. याशिवाय 'अजेय' सिनेमात परेश रावल आणि भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेता निरहूआ बघायला मिळतोय. योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास 'अजेय' सिनेमातून उलगडणार आहे.
कधी रिलीज होणार 'अजेय'
हा सिनेमा शांतनु गुप्ता यांचं बेस्टसेलर पुस्तक 'द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर' यावर आधारीत आहे. रविंद्र गौतम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अनंत जोशी, परेश रावल, निरहूआ यांच्यासोबत सिनेमात अजय मेंगी, पवन मल्होत्रा, राजेश खट्टर, गरिमा सिंह हे कलाकारही झळकणार आहेत. सिनेमाची रिलीज डेट अजून समोर आली नसली तरीही २०२५ लाच हा सिनेमा रिलीज होणार आहे.