IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 17:42 IST2025-06-05T17:38:37+5:302025-06-05T17:42:45+5:30

Karan Aujla IPL Betting Loss: एका प्रसिद्ध बॉलिवूड गायकाने पंजाब किंग्ज संघावर ३ कोटींचा सट्टा लावला होता. परंतु पंजाबची टीम हरल्याने त्या गायकाचं मोठं नुकसान झालंय

tauba tauba song Singer karan aujla loses Rs 3 crore in IPL betting bet on Preity Zinta Pbks team | IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा

IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा

नुकतीच IPL 2025 स्पर्धा पार पडली. या सीझनमध्ये फायनलला श्रेयस अय्यरच्या पंजाब किग्ज संघाचा, विराट कोहलीच्या RCB ने पराभव केला. पण या मॅचमुळे एका गायकाने तब्बल ३ कोटी रुपये गमावले आहेत. हा गायक म्हणजे करण औजला. २०२४ मध्ये तुफान व्हायरल झालेलं विकी कौशलचं 'तौबा तौबा' गाणं आठवतंय? हे गाणं करण औजलाने गायलं होतं. करणच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना कळाली असून सर्वत्र याचीच चर्चा आहे.

IPL च्या नादात करणने गमावले ३ कोटी

पंजाबी गायक आणि रॅपर करण औजलाने आयपीएल 2025 च्या फायनल मॅचमध्ये प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स संघावर ३.११ कोटींची (कॅनडियन डॉलर $500,000) मोठी पैज लावली होती. ही माहिती त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली होती. परंतु या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे करण औजलाने 3 कोटींहून अधिक रक्कम गमावली आहे. जर पंजाब किंग्स विजयी झाले असते, तर करणला जवळपास ६ कोटींचा फायझाला असता. 

IPL में 3 करोड़ हार गया ये सिंगर, प्रीति जिंटा की टीम PBKS पर लगाया था सट्टा

दुसरीकडे उलट परिस्थिती

करण औजलाचं तीन कोटींचं नुकसान झालं तर दुसरीकडे कॅनेडियन रॅपर ड्रेकने RCB संघावर तब्बल ११ कोटींची पैज लावली होती. फायनलमध्ये RCB ने बाजी मारल्याने  रॅपर ड्रेकला मोठा फायदा झाला. त्यामुळे कुठे नुकसान तर कुठे फायदा अशी परिस्थिती पाहायला मिळाली.  करण औजला मूळचा पंजाबमधील असून तो सध्या कॅनडामध्ये स्थायिक आहेत. 'बॅड न्यूज' सिनेमातील 'तौबा तौबा' गाण्याने करणला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. 

Web Title: tauba tauba song Singer karan aujla loses Rs 3 crore in IPL betting bet on Preity Zinta Pbks team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.