पतीचे अमेरिकन अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? आता 'तौबा तौबा' फेम गायकाच्या पत्नीने सोडलं मौन, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:03 IST2026-01-14T12:02:46+5:302026-01-14T12:03:18+5:30
तौबा तौबा फेम गायक करण औजलावर एका अमेरिकन अभिनेत्रीने विवाहबाह्य संबंधाचे आरोप लावले. आता करणच्या पत्नीने यावर मौन सोडलंय

पतीचे अमेरिकन अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? आता 'तौबा तौबा' फेम गायकाच्या पत्नीने सोडलं मौन, काय म्हणाली?
'तौबा तौबा' या सुपरहिट गाण्यामुळे घराघरांत पोहोचलेला प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर करण औजला सध्या एका मोठ्या वादात सापडला आहे. एक परदेशी गायिका आणि अभिनेत्रीने करणवर फसवणुकीचे आणि विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असतानाच, करणची पत्नी पलक औजला हिने एक खास पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नेमके प्रकरण काय?
कॅनडास्थित गायिका-अभिनेत्री 'एमएस गोरी' (Ms Gori) हिने सोशल मीडियावर दावा केला आहे की, करण औजला तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. धक्कादायक बाब म्हणजे, करण विवाहित असल्याचे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते, असा आरोप तिने केला आहे. जेव्हा तिला या लग्नाबद्दल समजले, तेव्हा तिला गप्प राहण्यासाठी धमकावण्यात आले आणि सोशल मीडियावर तिची बदनामी करण्यात आली, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

करणवर हे आरोप झाल्यानंतर त्याची पत्नी पलकची 'ती' पोस्ट चर्चेत आली. पतीवर आरोप होत असतानाही पलक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं दिसतंंय. पलकने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर करणसोबतचा एक अत्यंत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती करणच्या गालावर किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने बॅकग्राउंडला करणचेच गाजलेले 'विनिंग स्पीच' हे गाणे लावले आहे.
या गाण्यातील 'फॅन इक्को नार दा' (मी फक्त एकाच स्त्रीचा चाहता आहे) या ओळींना हायलाइट करत पलकने अप्रत्यक्षपणे या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. पलकच्या या कृतीमुळे ती आपल्या पतीच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणावर करण औजला किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले तरी, पत्नीच्या या पोस्टने कर