बॉलिवूड मेकर्स तारा सुतारियाच्या प्रेमात; डेब्यूआधीच मिळाला तिसरा चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:57 IST2019-03-26T14:57:37+5:302019-03-26T14:57:47+5:30
तारा सुतारिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मधून ताराचा डेब्यू होतोय. खरे तर ताराचा डेब्यू व्हायचाय. पण त्यापूर्वीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत.

बॉलिवूड मेकर्स तारा सुतारियाच्या प्रेमात; डेब्यूआधीच मिळाला तिसरा चित्रपट!!
ठळक मुद्देअहान हा ‘आरएक्स 100’ या तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमधून डेब्यू करतोय.
तारा सुतारिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मधून ताराचा डेब्यू होतोय. खरे तर ताराचा डेब्यू व्हायचाय. पण त्यापूर्वीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे पदार्पणाआधीच ताराला एका पाठोपाठ एक चित्रपटाच्या आॅफर्स मिळताहेत. ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’पाठोपाठ ताराला ‘मरजावां’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट दिसणार आहे. या चित्रपटापाठोपाठ आता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याच्या आगामी चित्रपटातही ताराची वर्णी लागलीय.
काही तासांपूर्वी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबतची घोषणा केली. ‘इट्स आॅफिशिअल, साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी चित्रपटात (नाव अद्याप ठरलेले नाही) अहान शेट्टीसोबततारा सुतारियाची जोडी जमणार,’असे त्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर जाहीर केले.
निमार्ता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. अहान हा ‘आरएक्स 100’ या तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमधून डेब्यू करतोय. या रिमेकचे नाव अद्याप ठरलेले नाही. दिग्दर्शन मिलन लुथरिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. मिलन लुथरियाने आत्तापर्यंत वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई , द डर्टी पिक्चर , बादशाहो यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
अहानच्या आधी त्याची बहीण अथिया शेट्टी हिने २०१५ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. सलमान खान निर्मित ‘हिरो’मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात अथिया सूरज पांचोलीसोबत दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता. अथिया व सूरजची जोडी प्रेक्षकांना आवडली नव्हती. अथियानंतर अहान आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. आता त्याचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच.