'ही' अभिनेत्री होणार जान्हवी कपूरची जाऊबाई? सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:12 IST2025-07-22T12:12:03+5:302025-07-22T12:12:18+5:30

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री वीरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

Tara Sutaria Confirm Relationship With Veer Pahariya Calls Him Mine | 'ही' अभिनेत्री होणार जान्हवी कपूरची जाऊबाई? सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट!

'ही' अभिनेत्री होणार जान्हवी कपूरची जाऊबाई? सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. सध्या ती राजकीय घराण्यातील सुपुत्र शिखर पहारिया याला डेट करत आहेत. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. यातच शिखरचा भाऊ वीर पहारिया चर्चेत आलाय.  शिखर आणि वीर हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. ते दोघे स्मृती शिंदे यांची मुले आहेत. सध्या वीरच्या लव्ह लाइफची जोरदार चर्चा सुरू आहे. वीर एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.


वीर पहारियानं 'स्काय फोर्स' या चित्रपटातून नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्याचं सध्या ज्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जातंय ती आहे तारा सुतारिया. दोघांनी या नात्यावर शिक्कामोर्तब (Tara Sutaria Confirms Relationship With Veer Pahariya) केल्याचं पाहायला मिळतंय. नुकतंच तारा सुतारियाने  एपी ढिल्लोसोबतचे काही फोटो शेअर केले. वीर पहारियाने 'माय शायनी स्टार' अशी कमेंट केली. तर ताराने रिप्लाय करत, 'माईन' असं लिहिलं. त्यामुळे वीर आणि ताराच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलंय.

तारा सुतारिया ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला खास ठसा उमटवला आहे.  'स्टुडंट ऑफ द इअर २'मधून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. तारा आणि वीर यांच्यात काही महिन्यांपूर्वीच चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालंय. दोघं काही वेळा एकमेकांसोबत डेटला गेले आहेत. तसेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये तारा आणि वीरने एकत्र रॅम्पवॉक केला होता. 


दरम्यान, याआधी वीरचं नाव सारा अली खान आणि मानुषी छिल्लरसोबत जोडलं गेलं होतं. तर तारा ही करीना कपूरचा आतेभाऊ आदर जैनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण, त्यांचं नात टिकलं नाही. काही महिन्यांपुर्वीचं आदर जैन हा अलेखा आडवाणीशी लग्नबंधनात अडकला. 

Web Title: Tara Sutaria Confirm Relationship With Veer Pahariya Calls Him Mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.