Ghode Pe Sawar Song : टांझानियाच्या 'पॉल भावंडांनाही घोडे पे सवार गाण्याची भूरळ, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 17:00 IST2023-01-18T16:59:14+5:302023-01-18T17:00:12+5:30

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले टांझानियाचे पॉल भावंडं आता आणखी एक व्हिडिओ घेऊन आले आहेत.

Tanzania Paul siblings also enjoyed singing Ghode Pe Sawar song video goes viral | Ghode Pe Sawar Song : टांझानियाच्या 'पॉल भावंडांनाही घोडे पे सवार गाण्याची भूरळ, व्हिडिओ व्हायरल

Ghode Pe Sawar Song : टांझानियाच्या 'पॉल भावंडांनाही घोडे पे सवार गाण्याची भूरळ, व्हिडिओ व्हायरल

Ghode Pe Sawar Song :  सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले  टांझानियाचे पॉल भावंडं आता आणखी एक व्हिडिओ घेऊन आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीची भूरळच या पॉल भावंडांना  पडली आहे. किली पॉल (Kili Paul) आणि त्याची बहिण नीमा पॉल (Neema Paul) नेहमीच लोकप्रिय गाणी, डायलॉग्सवर अभिनय करत असतात. भाषा समजत नसतानाही ते अगदी उत्कृष्टरित्या परफॉर्म करतात. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या भारतात एक गाणं खूपच गाजत आहे. नेटफ्लिक्सच्या कला सिनेमातील घोडे पे सवार'गाण्याने सर्वांनाच प्रेमात पाडले आहे. जिने गाणं गायलं आहे ती गोड आवाजाची गायिका सिरीशा भागवतुला यामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. लोक तिच्या आवाजाच्या प्रेमातच पडले आहेत. तर हेच गाणं आता टांझानियाच्या नीमा पॉल हिने देखील गायले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पॉल भावंडांच्या या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. भाषा समजत नसतानाही नीमा पॉलने खूपच छान पद्धतीने हे गाणं गायलं आहे. कमेंट्समध्ये सर्वच तिचे कौतुक करत आहेत. या रील्सच्या जमान्यात टांझानियाचे पॉल भावंडं सध्या खूपच लोकप्रिय होत आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर ४० लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.

Web Title: Tanzania Paul siblings also enjoyed singing Ghode Pe Sawar song video goes viral