'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:01 IST2024-11-30T11:01:25+5:302024-11-30T11:01:52+5:30
'आज की रात' हे 'स्त्री २' मधलं आयटम साँग चांगलंच गाजलं. पण तमन्ना आधी याला नकार देणार होती.

'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
अभिनेत्री तमन्ना भाटियाचं (Tamannaah Bhatia) 'बाहुबली' सिनेमानंतर नशीबच फळफळलं. तिच्या सौंदर्यावर तर चाहते फिदा झाले. शिवाय ती सध्या विजय वर्मासोबत रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. तमन्नाचं 'जेलर' सिनेमातील 'कावाला' हे आयटम साँगही गाजलं. यानंतर तिने 'स्त्री 2' मध्ये 'आज की रात' हे आयटम साँग केलं. हेही खूप गाजलं. मात्र तमन्ना आधी 'आज की रात' या गाण्याला नकार देणार होती. काय होतं ते कारण?
'स्त्री २' हा यंदाचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा. यात तमन्नाने केलेलं 'आज की रात' हे आयटम साँगही खूप लोकप्रिय झालं. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने हे आयटम साँग करण्याला आधी नकार दिला होता असा खुलासा केला. ती म्हणाली, "मी 'आज की रात' गाण्याला होकार द्यायला बराच वेळ घेतला होता. मला कळत नव्हतं की मी हे आयटम साँग केलं पाहिजे की नाही. कारण काही दिवस आधीच माझं 'कावाला' हे आयटम साँग आलं होतं. खरं सांगायचं तर मी कावाला गाण्यात माझा बेस्ट परफॉर्मन्स दिला नाही असंच मला वाटत होतं. मला वाटलं मी अजून चांगलं करु शकत होते. अशातच 'आज की रात' गाण्याची ऑफर आली तेव्हा मी विचारात पडले."
ती पुढे म्हणाली, "स्त्री २ चे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी मला सिनेमाची पूर्ण गोष्ट सांगितली. ते म्हणाले की मला शमा बनून नाचायचं आहे. शमा हे तुझं सिनेमातलं एक कॅरेक्टर असणार आहे. त्यामुळे हे काही तुझं फक्त आणखी एक आयटम साँग नसणार आहे. अमरचं ऐकल्यानंतर मला वाटलं की मी हे गाणं कावालापेक्षा वेगळं करु शकते. म्हणून मी मग होकार दिला."