कपल गोल्स! विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाची खास पोस्ट; चाहत्यांनीही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:13 IST2023-12-08T17:11:30+5:302023-12-08T17:13:53+5:30
तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत.

कपल गोल्स! विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाची खास पोस्ट; चाहत्यांनीही केलं कौतुक
'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.
नुकतेच विजय वर्माला 'दहाड' मधील कामगिरीसाठी प्रतिष्ठित आशियाई अकादमीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या या यशाचे तमन्ना भाटियानेही इन्स्टावर स्टोरी शेअर करत कौतुक केलं. तर विजयने आपला पुरस्कार तमन्नाला समर्पित केला. त्याने इन्स्टा स्टोरीवर लिहिले, ही गोल्डन देवी माझ्या देवीसाठी आणतोय'. या स्टोरींमधून त्यांच्यातील प्रेम स्पष्टपणे झळकतंय.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम करताना दिसले होते. एका रिपोर्टनुसार, दोन्ही स्टार्स या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पहिल्यांदाच गोव्यात न्यू इयर सेलिब्रेट करताना दिसले, त्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. अखेर दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.