बॉयफ्रेंडसोबत तापसी पन्नूचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा केवळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 13:42 IST2018-01-15T08:12:43+5:302018-01-15T13:42:43+5:30

बॉलिवूडमध्ये पिंक चित्रपटातून  तापसी पन्नूने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.' नाम शबाना', 'बेबी' सारख्या सीरियस चित्रपटात ती झळकली ...

Talking about the breakup of Tapi Pannu with boyfriend, only rumors | बॉयफ्रेंडसोबत तापसी पन्नूचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा केवळ अफवा

बॉयफ्रेंडसोबत तापसी पन्नूचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा केवळ अफवा

लिवूडमध्ये पिंक चित्रपटातून  तापसी पन्नूने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.' नाम शबाना', 'बेबी' सारख्या सीरियस चित्रपटात ती झळकली होती. जुडवा 2 या हलक्या-फुलक्या कॉमेडी चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची खास झलक प्रेक्षकांना दाखवली. अभिनेत्री तापसी पन्नूला खेळाबाबत विशेष प्रेम आहे. ऐवढेच नाही जर तापसी अभिनेत्री बनली नसती तर ती नक्कीच एक खेळाडू झाली असती असे तिनेच सांगितले होते. बॅडमिंटनपटू मसायस बोईसोबत तापसीचे अफेअर सुरु होते. मसायसला ऑल्मिंपिकमध्ये सिल्वर मेडल मिळाले आहे.  नुकतेच तापसीच्या ब्रेकअपची चर्चा होती. तपासीच्या आयुष्यात आणखीन कोणाची तरी एंट्री झाल्यामुळे तिचे आणि मसायसचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र तापसीच्या एक जवळच्या व्यक्तीने ही गोष्ट केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे की, व्हॅकेशन एन्जॉय करायला तापसी आणि मसायस गोव्याला गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यासोबत तापसीची बहिण शगुन पण होता. मसायस न्यू इअरच्या दिवशी तापसीसोबत नव्हता. कारण त्याला 1 जानेवारीला लखनऊमध्ये होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सहभागी व्हायचे होते. 

ALSO READ :   ट्रोल करणाऱ्यावर तापसी पन्नू संतापली; वाचा तिने नेमके काय म्हटले?

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार मसायसचे पैरंट्स ज्यावेळी मुंबईत येतात त्यावेळी तापसी किती ही व्यस्त असली तरी त्यांना अवर्जुन वेळ काढून भेटते. तापसी आणि मसायसची ओळख 2013 मध्ये झालेल्या बॅडमिंटन लीग दरम्यान झाली होता त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. तापसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जुडवानंतर तापसी 'हॉकी पटू संदीप सिंग'च्या आयुष्यावर आधारित चित्रपट दिसणार आहे. लवकरच तापसी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात ती स्वत: एका हॉकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करतो आहे.

Web Title: Talking about the breakup of Tapi Pannu with boyfriend, only rumors