"लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:38 IST2026-02-22T15:38:05+5:302026-02-22T15:38:37+5:30

तापसी पन्नूने पहिल्यांदाच पतीबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

taapsee pannu talks about life after marriage also shares how is his husband mathias boe | "लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू?

"लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने जेव्हा आपल्या लग्नाची बातमी अचानक समोर आणली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. गुपचूप पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली. तापसीने या सोहळ्याला ना कोणाला आमंत्रित केले होते, ना सोशल मीडियावर कोणतीही पूर्वसूचना दिली होती. मात्र, आता बऱ्याच काळानंतर तापसीने आपल्या लग्नाच्या निर्णयावर मोकळेपणाने भाष्य केले आहे.

सध्या तापसी तिच्या 'अस्सी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून याच निमित्ताने तिने शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि जोडीदाराबद्दल अनेक खुलासे केले. मॅथियास बोए बद्दल तिला नक्की काय आवडलं, या प्रश्नावर उत्तर देताना तापसी म्हणाली की, "त्याने मला नात्यात कधीच ओझे जाणवू दिले नाही. त्याच्यासोबत असताना मला कधीही कोणत्या बंधनात अडकल्यासारखे वाटले नाही."

लग्नानंतरच्या अनुभवावर बोलताना तापसीने एक मजेशीर विधान केले. ती म्हणाली, "लग्नानंतर अनेकजण मला विचारतात की आता तुला कसे वाटतेय? पण खरं सांगू तर, मी अनेकदा विसरून जाते की माझे लग्न झाले आहे. आयुष्यात कोणताही अतिरिक्त बदल किंवा लग्नाआधी आणि लग्नानंतर असा फरक मला कधीच जाणवला नाही." तापसीच्या या बोलण्यातून ती तिच्या संसारात आणि जोडीदारासोबत किती सुखी व समाधानी आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

तापसी पन्नू आणि मॅथियास बोए यांनी डिसेंबर २०२४ मध्ये राजस्थानमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, लग्नापूर्वी हे दोघे सुमारे १३ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तापसीने अद्यापही तिच्या लग्नाचे अधिकृत फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. अत्यंत साधेपणाने आणि प्रसिद्धीपासून दूर राहून तिने आपल्या आयुष्याची ही नवी सुरुवात केली आहे.

Web Title : तापसी पन्नू: शादी के बाद कुछ नहीं बदला, पति के बारे में बात की।

Web Summary : तापसी पन्नू ने अपनी फिल्म 'अस्सी' का प्रचार करते हुए बताया कि उनकी शादी में कुछ नहीं बदला है। वह अपने साथी मैथियास बोए की सराहना करती हैं कि उन्होंने उन्हें प्रतिबंधित महसूस नहीं कराया। उन्होंने दिसंबर 2024 में राजस्थान में 13 साल के रिश्ते के बाद शादी कर ली, समारोह को निजी रखा।

Web Title : Taapsee Pannu: Marriage feels no different, talks about husband.

Web Summary : Taapsee Pannu, promoting her film 'Assi,' revealed her marriage feels unchanged. She appreciates her partner, Mathias Boe, for not making her feel restricted. They married in Rajasthan in December 2024 after a 13-year relationship, keeping the ceremony private.