लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:27 IST2025-10-24T16:26:49+5:302025-10-24T16:27:51+5:30
तापसी पन्नूने मजेशीर अंदाजात लिहिली पोस्ट, परदेशात स्थायिक होण्याच्या चर्चांवर म्हणाली...

लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
अभिनेत्री तापसी पन्नूने गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुपचूप लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आणि सर्वांना सुखद धक्काच बसला. तापसीचा नवरा मॅथियास बोए हा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियास डेन्मार्कचा आहे. तापसी पन्नू नवऱ्यासोबत डेन्मार्कलाच स्थायिक झाल्याची बातमी व्हायरल झाली. तापसी डेन्मार्कमध्ये नवराच नाही तर सासू सासऱ्यांसोबतही राहते असं बातमीत म्हटलं गेलं. आता तापसीने पोस्ट शेअर करत त्या बातमीचं खंडन केलं आहे.
तापसी पन्नूने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले, 'यापेक्षा कमी थोटी आणि कमी सनसनी हेडलाईन मिळेल का? जरा रिसर्च तरी करा. इतकी काय घाई आहे?' तापसीने बातमी पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सोबतच ती मुंबईत असल्याचंही तिने सांगितलं. ती मजेशीर अंदाजात लिहिले,'मुंबईच्या दमट, गरम वातावरणात सकाळी डोसा खाताना मी ही बातमी पाहत आहे'.
तापसी एका मुलाखतीत म्हणाली होती की, "डेन्मार्कला त्यांचं घर आहे. तिथे तिने भारतीय परंपरा जपली आहे. मॅथियास तिथे आपल्या आई वडिलांसोबतच राहतो. त्यांचा वेगळा मजला आहे. डेनिश संस्कृतीमध्ये हे पाहायला मिळत नाही पण कुटुंबाचं एकत्र असणंच घराला घरपण देतं."
तापसी पन्नू लवकरच 'गांधारी'मध्ये दिसणार आहे. हा एक इंटेन्स रिव्हेंज ड्रामा आहे. देवाशीष मखीजा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा रिलीज होणार आहे.