'500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 21:25 IST2025-02-19T21:24:20+5:302025-02-19T21:25:09+5:30

Swara Bhasker on Chhaava Movie : अभिनेत्री स्वरा भास्करला 'छावा' चित्रपटाबाबत केलेल्या पोस्टवरुन ट्रोल केले जात आहे.

Swara Bhasker on Chhaava Movie: 'Fictional atrocities on Hindus 500 years ago...'; Swara Bhasker's controversial post about the movie 'Chhaava' | '500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद

'500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद

Swara Bhasker on Chhaava Movie : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादात सापडते. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. आता पुन्हा एकदा स्वरा आपल्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. स्वराने नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा (Chhaava) चित्रपटाविषयी पोस्ट केली आहे. 

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर 'छावा' चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. संभाजी महाराजांचा पराक्रम अन् त्यांच्यावर औरंगजेबाकडून झालेला अनन्वित छळ या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने 150+ कोटींची कमाई केली आहे. अनेकांकडून चित्रपटाचे आणि खासकरुन विकी कौशलचे (Vicky Kaushal) कौतुक केले जात आहे. मात्र, अभिनेत्री स्वरा भास्करने या चित्रपटाबाबत केलेल्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काय म्हणाली स्वरा भास्कर?

स्वराने सोशल मीडियावर लिहिले, 'गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरीत लोकांचे भयावह मृत्यू झाले, बुलडोझरद्वारे मृतदेह काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक फिल्मी अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय. हा समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय', असे स्वरा भास्करने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या पोस्टनंतर स्वरा ट्रोल होत आहे. 

सोशल मीडियावर ट्रोल 
या पोस्टनंत स्वराला अनेकजण ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले, 'हे ट्विट तुझ्या ढासळत्या मानसिक आरोग्याचे गंभीर संकेत आहे. तुला तात्काळ मदतीची गरज आहे.' दुसऱ्याने लिहिले, 'तुझी मानसिक स्थिती बिघडली आहे. हिंदू फोबियाची लक्षणे स्पष्टपणे दिसत आहेत. वेळेवर उपचार कर, नाहीतर उशीर होईल.' यासर अनेकजणांनी स्वराच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.  


छावाला तुफान प्रतिसाद
विकी कौशलच्या छावाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने पाच दिवसांत 165 कोटींचा गल्ला जमवला आहे. छावामध्ये विकी कौशलसोबत रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. छावा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दिनेश विजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. 

Web Title: Swara Bhasker on Chhaava Movie: 'Fictional atrocities on Hindus 500 years ago...'; Swara Bhasker's controversial post about the movie 'Chhaava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.