पाकिस्तानी डिझायनरच्या लेहेंग्यात दिसली स्वरा भास्कर, 'नॅशनल शेम' म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:59 IST2023-03-21T13:58:21+5:302023-03-21T13:59:30+5:30
स्वराने लग्नात भारतीय फॅशन डिझायनर्सना डच्चू देत चक्क पाकिस्तानी फॅशन डिझायनरला लेहेंगा परिधान केला.

पाकिस्तानी डिझायनरच्या लेहेंग्यात दिसली स्वरा भास्कर, 'नॅशनल शेम' म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल
बॉलिवूडमध्ये लग्नसराई म्हणलं की सब्यसाची (Sabyasachi) किंवा मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा लेहेंगा परिधान करण्याची अभिनेत्रींची इच्छा असते. अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. स्वराने लग्नात या भारतीय फॅशन डिझायनर्सना डच्चू देत चक्क पाकिस्तानी फॅशन डिझायनरला लेहेंगा परिधान केला. पाकिस्तानवरचं प्रेम म्हणत आता स्वरा ट्रोल होत आहे.
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद नुकतेच लग्नबंधनात अडकले. निकाहनंतर दोघांचा 'वलीमा' बरेली इथे पार पडला. यावेळी स्वराने परिधान केलेला लेहेंगा एका पाकिस्तानी डिझायनरने डिझाईन केल्याचं लक्षात आलं. स्वराने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत लिहिले, एक नजर अलीच्या सुंदर स्टुडिओमध्येही बघा, या लेहेंग्याची डिलीव्हरी बॉर्डर पार झाली आहे. नटरानी या अकाऊंटला टॅग करत तिने आभार मानले.
स्वराच्या वलीमाचा फोटो बघून नेटकरी संतापले. कोणी तिला घागरा ए मुमताज म्हणले तर कोणी पाकिस्तानवर प्रेम जास्तच आहे असं म्हणत ट्रोल केले आहे. एका युझरने तिला टॅग करत नॅशनल शेम असेही संबोधले आहे. तर कोणी टुकडे टुकडे गॅंग म्हणले आहे. सध्या तिच्या पोस्टवर अशाच कमेंट्सचा भडिमार होत आहे.