सुशांतच्या मृत्युनंतर उद्धवस्त झालं घरदार; पाहा सध्या कोणत्या अवस्थेत आहे त्याचं कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:43 IST2023-06-14T18:41:13+5:302023-06-14T18:43:11+5:30
Sushant singh rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या लाडक्या श्वानाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

सुशांतच्या मृत्युनंतर उद्धवस्त झालं घरदार; पाहा सध्या कोणत्या अवस्थेत आहे त्याचं कुटुंब
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्याविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयशैलीच्या जोरावर सुशांतने लहान पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर थेट भरारी घेतली होती. उत्तम अभिनयकौशल्यामुळे सुशांतने कमी काळात बॉलिवूडमध्ये त्याचं भरभक्कम स्थान निर्माण केलं होतं. मात्र, २०२० मध्ये त्याने अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला. इतंकच नाही तर सुशांतचा मृत्यू झाला की घातपात हे कोडंदेखील अद्यापही उलगडलेलं नाही. अनेकांच्या मनात सुशांतच्या मृत्यूविषयी अनेक प्रश्न आहेत. त्याच्या मृत्यूला आज ३ वर्ष झाली. मात्र, त्याला विसरणं आजही चाहत्यांना शक्य होत नसल्याचं पाहायला मिळतं.
सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याचे कुटुंबीय प्रकाशझोतात आले. आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी त्याच्या बहिणींनी आणि वडिलांनी प्रचंड प्रयत्न केलं. त्यामुळे राजपूत कुटुंबीय प्रचंड चर्चेत आले होते. मात्र, कालांतराने हे कुटुंबदेखील चर्चेतून बाहेर गेलं. आजही त्यांचा सुशांतला न्याय मिळावा यासाठी संघर्ष सुरु आहे. परंतु, या तीन वर्षांच्या काळात त्यांच्या जीवनात काय बदल झाला हे नुकतंच समोर आलं आहे.
वडिलांना आला हृदयविकाराचा झटका
सुशांतचा मृत्यू होऊन ३ वर्ष झाली तरी त्याचे कुटुंबीय या दु:खातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या निधनानंतर सहा महिन्यांनी त्याच्या वडिलांना कृष्ण कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात होते. कृष्ण कुमार सध्या प्रचंड खचले असून ते सतत सुशांतच्या आठवणींमध्ये असतात. सध्या सुशांतच्या बहिणीच त्यांचा सांभाळ करत आहेत. आजही सुशांतच्या वाढदिवशी त्याच्या बहिणी भावूक होताना दिसतात.त्याच्यासाठी त्या सोशल मीडियावर पोस्टही शेअर करतात.
सुशांतच्या प्रिय श्वासानाचीही झाला मृत्यू
सुशांतचं मुक्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम होतं. त्याच्याकडे काळ्या रंगाचा फज हा लॅब्राडोर कुत्रादेखील होता. मात्र, जानेवारी २०२३ मध्ये त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, १४ जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथे त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्याच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम आहे. काहींच्या मते त्याने आत्महत्या केली तर काहींच्या मते त्याची हत्या झाली आहे. आज त्याच्या मृत्यूला ३ वर्ष उलटली असून त्याचे कुटुंबीय आजही निर्णयाची वाट पाहत आहेत.