सुपरहिट सिनेमांचे आले सीक्वेल, रातोरात ओरिजनल कलाकारांनाच दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 18:16 IST2024-02-01T18:15:38+5:302024-02-01T18:16:17+5:30
अगदी आघाडीवरच्या टॉपच्या कलाकारांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सुपरहिट सिनेमांचे आले सीक्वेल, रातोरात ओरिजनल कलाकारांनाच दाखवला बाहेरचा रस्ता
एखादा सिनेमा हिट झाला की त्याचा सीक्वेल येणार हा आजकालचा ट्रेंडच बनला आहे. काही सिनेमांचे सीक्वेल हे पहिल्या सारखेच सुपरहिट झाले आहेत तर काही सीक्वेल दणकून आपटले आहेत. पण सीक्वेलमध्ये ओरिजनल कलाकारांनाच काढून टाकणं अशीही उदाहरणं आहेत. अगदी आघाडीवरच्या टॉपच्या कलाकारांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. असे कोणते सिनेमे आणि त्यांचे सीक्वेल आहेत बघुया...
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. भारतातच नाही तर ती जगभरात लोकप्रिय आहे. मात्र दीपिकाला तिच्याच एका सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलमध्ये घेण्यात आलेलं नाही. दीपिका, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा सुपरहिट 'कॉकटेल' सिनेमा येणार अशी चर्चा आहे. मात्र यामध्ये दीपिका नाही तर अनन्या पांडे आणि सारा अली खानचा विचार सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच आलेल्या माहितीनुसार, सुपरहिट 'नो एन्ट्री' सिनेमाच्या सीक्वेलमधून मुख्य अभिनेते सलमान खान (Salman Khan), अनिल कपूर, फरदीन खान यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे तिघेही 'नो एन्ट्री' च्या पुढील भागात दिसणार नाहीत.
'खिलाडी' अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'भुलभुलैय्या' तर सर्वांनाच माहित आहे. यातील अक्षयचं पात्र खूपच लोकप्रिय झालं होतं. मात्र याच सिनेमाच्या सीक्वेलमध्ये अक्षयला न घेता त्याच्याजागी कार्तिक आर्यनला घेण्यात आलं.
अर्शद वारसीचा (Arshad Warsi) कोर्ट ड्रामा असलेला 'जॉली एलएलबी' सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता. मात्र याच सिनेमाच्या दुसऱ्या भागात अर्शद वारसीच्या जागी अक्षय कुमार दिसला.
गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेला 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' सिनेमा सुपरहिट झाला. यामध्ये अजय देवगण, इम्रान हाश्मीच्या अभिनयाने कमालच केली होती. मात्र सिनेमाच्या दुसऱ्या भागात दोघांनाही डच्चू देत अक्षय कुमारला रोल मिळाला होता.