"मी मर्दासारखं बोलतो आणि तू..."; सुनील शेट्टीचा राग अनावर, मिमिक्री आर्टिस्टला सर्वांसमोर झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:53 IST2025-08-26T13:52:25+5:302025-08-26T13:53:16+5:30

भोपाळमधील एका कार्यक्रमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय घडलं नेमकं?

Sunil shetty angry on mimicry artist who doing bad mimicry at bhopal uttar pradesh | "मी मर्दासारखं बोलतो आणि तू..."; सुनील शेट्टीचा राग अनावर, मिमिक्री आर्टिस्टला सर्वांसमोर झापलं

"मी मर्दासारखं बोलतो आणि तू..."; सुनील शेट्टीचा राग अनावर, मिमिक्री आर्टिस्टला सर्वांसमोर झापलं

अभिनेता सुनील शेट्टी हा तसा कोणत्याही वादविवादात तितका अडकताना दिसत नाही. पण नुकतंंच सुनील शेट्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका कार्यक्रमात सुनील एका मिमिक्री आर्टिस्टवर संतापल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सुनील शेट्टीवर लोकांनी टीका केली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

सुनील शेट्टी चांगलाच भडकला

मीडिया रिपोर्टनुसार सुनील शेट्टी भोपाळमधील एका कार्यक्रमात उपस्थित होता. तिथे एका मिमिक्री आर्टिस्टने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण ती नक्कल सुनील शेट्टीला अजिबात आवडली नाही. तो स्टेजवरच त्या आर्टिस्टवर भडकला. याशिवाय त्याला कठोर शब्दात सुनावलं. सुनील शेट्टी त्या आर्टिस्टला म्हणाला की, “तुझा आवाज लहान मुलासारखा वाटतोय. एवढी वाईट नक्कल मी कधीच पाहिली नाही. मी जेव्हा बोलतो, तेव्हा मर्दासारखा बोलतो, पण तू एखाद्या लहान मुलासारखा बोलतो आहेस. सुनील शेट्टी होण्यासाठी खूप वेळ लागतो. तू माझी नक्कल करण्याचा प्रयत्नही करू नकोस. तू माझे अॅक्शन सिनेमे पाहिले नाहीस वाटतं.''


सुनील शेट्टीने सुनावल्यानंतर त्या कलाकाराने सर्वांसमोर अभिनेत्याची नम्रपणे माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर सुनील शेट्टीवर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी त्याला ट्रोल करत म्हटले आहे की, 'एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा सार्वजनिकपणे अपमान करणे योग्य नाही'. अनेक युजर्सने म्हटले आहे की, ‘कलाकाराला प्रोत्साहन देण्याऐवजी, त्याचा अपमान करणे चुकीचे आहे.’ अशाप्रकारे सुनील शेट्टीवर लोकांनी टीका केली आहे.

Web Title: Sunil shetty angry on mimicry artist who doing bad mimicry at bhopal uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.