एकीकडे लेक तापाने फणफणत होती अन्...; सुनील शेट्टीने सांगितला 'बॉर्डर'च्या शूटिंगचा भावुक किस्सा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:39 IST2025-07-29T16:36:23+5:302025-07-29T16:39:16+5:30
"मी टेन्शनमध्ये होतो, कारण...", सुनील शेट्टीने सांगितला 'बॉर्डर' सिनेमाच्या शुटिंगच्या आठवणी

एकीकडे लेक तापाने फणफणत होती अन्...; सुनील शेट्टीने सांगितला 'बॉर्डर'च्या शूटिंगचा भावुक किस्सा, म्हणाला...
Suniel Shetty: जे. पी. दत्ता यांचा बॉर्डर. भारत-पाकिस्तान युद्धाची कथा सांगणारा हा मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २८ वर्ष झाली आहेत. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने त्यावेळी सर्वाधिक कमाई तर केली त्याचबरोबर या सिनेमाने अनेक इतिहाससुद्धा रचले. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट अभिनेत्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. सध्या सुनील शेट्टी हंटर सीझन २ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान अभिनेत्याने बॉर्डर सिनेमाच्या शूटिंगच्या काही अविस्मरणीय आठवणी शेअर केल्या.
अलिकडेच 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने बॉर्डर चित्रपटातील तो चलॅूं गाण्याच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा सांगितला. या गाण्यामध्ये लग्नानंतर लगेच त्याला सैन्यात सेवेवर रुजू होण्याचे आदेश येतात. ते गाणं शूट करताना टेन्शनमध्ये होतो, असं खुलासा त्याने मुलाखतीत केला. त्याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, 'सुहागरात' बद्दल ऐकल्यानंतर, मी खूप टेन्शमध्ये आलो होतो,की आपण ते गाणं कसं शूट करायचं? पण, जेव्हा जेपी दत्ताजींनी हे गाणं ऐकवलं तेव्हा मला स्पष्टपणे कळलं की फक्त एकच व्यक्ती हे गाणं अशा प्रकारे शूट करू शकते. आणि जेपीजींनी ते गाणं खूपच सुंदरित्या शूट केलं होतं.
त्यानंतर सुनील शेट्टीने सांगितलं, ज्या वेळी तो चलॅूं गाण्याचं शूट होतं, तेव्हा आथियाला खूप ताप आला होता. आणि ती फक्त ३ वर्षांची होती. अंगात ताप असताना मी तिला घरी परत पाठवलं. त्यामुळे मी तिला सतत फोन करत होतो. तिला मुंबईला जायचे होतं पण जास्त ताप असल्यामुळे ती दिल्लीला पोहोचली. ती रात्र मी कधीही विसरू शकणार नाही. जोपर्यंत आम्हाला तिच्या तब्ब्येतीबद्दल अपडेट नव्हती तोवर आमच्याही जीवात जीव नव्हता. पण, सर्व काही ठिक आहे, असं मानाने आम्हाला सांगितलं तेव्हा टेन्शन कमी झालं." असा खुलासा अभिनेत्याने केला.