सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:02 IST2019-05-14T11:58:52+5:302019-05-14T12:02:35+5:30

करिअर ऐन भरात असताना केलेल्या काही चुका सुनील शेट्टीला महागात पडल्या. आज इतक्या वर्षांनंतर खुद्द सुनीलनेही हे मान्य केले आहे.

suniel shetty said i have made mistakes in my career | सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!

सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!

ठळक मुद्देसध्या सुनील शेट्टी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या एका बिग बजेट चित्रपटात काम करत आहे.

९० च्या दशकात लीड अभिनेत्यांच्या यादीत सुनील शेट्टीचे नाव होते. अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या जोडीने अ‍ॅक्शन हिरो म्हणून सुनील शेट्टीचे नाव घेतले जात होते. पण काळासोबत या तिघांचे करिअर वेगवेगळ्या वळणावर पोहोचले. अक्षय व अजय दोघेही स्वत:चे स्टारडम टिकवण्यात यशस्वी ठरलेत. याऊलट सुनील शेट्टी या रेसमधून कधीच बाद झाला. करिअर ऐन भरात असताना केलेल्या काही चुका सुनील शेट्टीला महागात पडल्या. आज इतक्या वर्षांनंतर खुद्द सुनीलनेही हे मान्य केले आहे.


५७ वर्षांच्या सुनीलने अलीकडे एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या चुका मान्य केल्यात. ‘आज मी अक्षय व अजयला पाहतो, तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटतो. ते माझे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचा मला अजिबात हेवा वाटत नाही. मी आज जिथे कुठे आहे,त्यासाठी मी केलेल्या चुका जबाबदार आहेत. मी भावनेच्या भरात चित्रपट केलेत. कधीच करिअरविषयक गोष्टी प्लान केल्या नाहीत. दिग्दर्शक म्हणतो म्हणून मी चित्रपट करत गेलो. माझ्या अपयशाचे कारण माझ्या या चुका आहेत, असे मी मानतो,’ असे सुनील यावेळी म्हणाला.


  सुनील शेट्टीने आपल्या करिअरमध्ये अनेक धडाकेबाज चित्रपट दिलेत. पण २००० सालानंतर त्याला चित्रपट मिळणे हळूहळू बंद झाले. आता तो अगदी एखाद्या चित्रपटात झळकतो. सध्या सुनील शेट्टी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या एका बिग बजेट चित्रपटात काम करत आहे. याशिवाय ‘हेरा फेरी ३’ मध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी एकत्र येतील अशी चर्चा आहे.

Web Title: suniel shetty said i have made mistakes in my career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.