सुभाष घईंनी शेअर केला सिन्हा कुटुंबासोबत फोटो, सोनाक्षीचे दोन्ही भाऊ इथेही गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 09:40 IST2024-07-12T09:39:25+5:302024-07-12T09:40:01+5:30

लव सिन्हा आणि कुश सिन्हा हे जुळे भाऊ आहेत. लाडकी बहीण सोनाक्षीवर ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Subhash Ghai shared a photo with the Sinha family Sonakshi two brothers missing here too? | सुभाष घईंनी शेअर केला सिन्हा कुटुंबासोबत फोटो, सोनाक्षीचे दोन्ही भाऊ इथेही गायब

सुभाष घईंनी शेअर केला सिन्हा कुटुंबासोबत फोटो, सोनाक्षीचे दोन्ही भाऊ इथेही गायब

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने(Sonakshi Sinha) काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Zaheer Iqbal) आंतरधर्मीय विवाह केला. मुंबईतील जुहू इथल्या घरीच त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं. या लग्नाची आधीपासूनच जोरदार चर्चा होती. कारण सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या कुटुंबातूनच विरोध असल्याचं स्पष्ट दिसत होतं. नंतर तिचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सहमती दिली. मात्र सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लव-कुश (Luv-Kush) यांनी मात्र बहिणीशी संबंधच तोडल्याची चर्चा आहे.

लव सिन्हा आणि कुश सिन्हा हे जुळे भाऊ आहेत. सोनाक्षी ही त्यांची लाडकी बहीण आहे. मात्र बहिणीच्या आनंदाच्या क्षणी दोन्ही भाऊ गायब असल्याची चर्चा होती. लव सिन्हाने याचं खंडन केलं असलं तरी सोशल मीडियावर तो बहिणीला फॉलो करत नाही. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी त्याने शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फॅमिली फोटो शेअर केला होता. या फोटोत सोनाक्षीच नव्हती तेव्हा चर्चा  अधिकच तीव्र झाल्या. आता दिग्दर्शक सुभाष घई यांनी सिन्हा कुटुंबासोबत फोटो  शेअर करत शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये सुभाष घई, त्यांची पत्नी, शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, सोनाक्षी, जहीर, जहीरचे वडील दिसत आहेत. यातही सोनाक्षीचे दोन्ही बाऊ दिसत नसल्याने पुन्हा चर्चेला पेव फुटला आहे.

 

सोनाक्षी आणि जहीरचं लग्न तिच्या सख्ख्या भावांनाच मान्य नसल्याचं चित्र वेळोवेळी दिसून येतंय. लव सिन्हाने अनेकदा बातम्यांचं खंडन केलं असतं तरी सोशल मीडियावर वेगळंच चित्र दिसत आहे. आता यावर लव सिन्हाची पुन्हा काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: Subhash Ghai shared a photo with the Sinha family Sonakshi two brothers missing here too?