"आजकालच्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नाहीत, त्यांना फक्त..."; अनिल कपूर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:18 IST2026-02-24T15:13:11+5:302026-02-24T15:18:58+5:30

बॉलिवूडचा 'एव्हरग्रीन' अभिनेता अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी 'सूबेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यावेळी अभिनेत्रींसोबत काम करण्याच्या मुद्द्यावर अनिल कपूर यांनी केलेले विधान आता चर्चेचा विषय ठरले आहे.

subedar movie actress Anil Kapoor big statement on working with actress in bollywood movies | "आजकालच्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नाहीत, त्यांना फक्त..."; अनिल कपूर यांचं मोठं विधान

"आजकालच्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नाहीत, त्यांना फक्त..."; अनिल कपूर यांचं मोठं विधान

बॉलिवूडचा 'एव्हरग्रीन' अभिनेता अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी 'सूबेदार' (Subedar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी अनिल कपूर यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत उपस्थित मीडियाशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्रींसोबत काम करण्याच्या मुद्द्यावर अनिल कपूर यांनी केलेले विधान आता चर्चेचा विषय ठरले आहे.

"कोणीही माझ्यासोबत काम करायला तयार नाही"

ट्रेलर लाँच दरम्यान अनिल कपूर यांना त्यांच्या सह-अभिनेत्रींसोबतच्या समीकरणाबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ते मजेशीरपणे म्हणाले, "काय सांगू यार, आजकाल कोणतीच अभिनेत्री माझ्यासोबत काम करायला तयार नाही. त्यांना फक्त तरुण मुलांसोबतच काम करायचं असतं. ज्या माझ्या वयाच्या किंवा ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, त्यादेखील माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक नाहीत. तुम्हीच आता माझ्यासोबत काम करण्यासाठी कोणालातरी सांगा."

अभिनेत्रींसोबतच्या जुन्या आठवणींबद्दल बोलण्याऐवजी अनिल कपूर यांनी सध्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ते म्हणाले, "भूतकाळाबद्दल कशाला बोलायचं? भविष्याबद्दल बोला, वर्तमानाबद्दल बोला आणि मुख्य म्हणजे 'सूबेदार'बद्दल बोला." 'सूबेदार' या आगामी चित्रपटात अनिल कपूर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

 सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केलेला 'सूबेदार' हा चित्रपट ५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात न येता थेट 'अ‍ॅमेझॉन प्राईम' (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ॲक्शन आणि इमोशन्सने भरलेला हा चित्रपट अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी एक मोठी मेजवानी ठरेल.

Web Title : अभिनेत्रियाँ मेरे साथ काम नहीं करतीं; उन्हें युवा हीरो चाहिए: अनिल कपूर

Web Summary : अनिल कपूर, 'सूबेदार' का प्रचार करते हुए, मजाक में अभिनेत्रियों की युवा सह-कलाकारों के प्रति पसंद पर विलाप करते हैं। उन्होंने वर्तमान और अपनी आगामी फिल्म पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया, जो 5 मार्च से अमेज़न प्राइम पर स्ट्रीमिंग होगी।

Web Title : Actresses don't work with me; they want young heroes: Anil Kapoor

Web Summary : Anil Kapoor, promoting 'Subedar,' jokingly laments actresses' preference for younger co-stars. He urges focusing on the present and his upcoming film, streaming on Amazon Prime from March 5.