पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना मिळाले होते रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:37 IST2018-02-26T11:07:26+5:302018-02-26T16:37:26+5:30

बॉलिवूडची चांदनी शनिवारी रात्री निखळली श्रीदेवी यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. दुबईत लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी परत आल्याच नाहीत. श्रीदेवी ...

Sridevi received for the first film, more honor than Rajinikanth | पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना मिळाले होते रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त मानधन

पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना मिळाले होते रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त मानधन

लिवूडची चांदनी शनिवारी रात्री निखळली श्रीदेवी यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. दुबईत लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी परत आल्याच नाहीत. श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. 1967 साली त्यांचा एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता. आता त्यांच्याशी संबंधीत अजून एक गोष्ट समोर आली आहे.     

इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. या चित्रपटाच्या रिलीजनंतर श्रीदेवी या अभिनेते प्रकाश राज यांच्या शोमध्ये गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी एक खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की  'मोन्द्रु मुदिचू' याचित्रपटासाठी त्यांना रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळाले होते. श्रीदेवीने सांगितले होते की, कमल हसन यांना 30 हजार रजनीकांत यांना 2000 ते 5000 रुपये मिळाले होते. त्यावेळी रजनीकांत आणि श्रीदेवी याक्षेत्रात नवे होते तर कमल हसन प्रसिद्ध होते.      
मॉम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.मॉम या चित्रपटातील तिने साकारलेली आई प्रेक्षकांना चांगलीच भावली. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील 300 वा चित्रपट ठरला आणि शेवटचा ठरला.  इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट त्यांचा खूपच हिट ठरला होता.  त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें,  मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. शाहरुख खानच्या झिरो चित्रपटात त्या आपल्याला दिसणार आहे. 

श्रीदेवी यांचे पार्थिव अजूनही दुबईतच आहे. सध्या अल क्वासिस येथील शवगृहात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. आता फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यांचे मृत्युपत्र बनवण्यात येईल. त्यानंतर पोलिस श्रीदेवी यांचे पासपोर्ट तपासतील आणि दुबई येथील भारतीय दूतावास त्यांचे पासपोर्ट रद्द करतील. त्यानंतर नो ऑब्सेक्शन सर्टिफिकेट आणि मृत्यूपत्र दिले जाईल. ही सर्टिफिकेट्स अरबी भाषेमध्ये असात. त्याचे इंग्रजी भाषांतर करण्यात येईल आणि ते सर्टिफिकेट श्रीदेवीच्या कुटुंबियांना देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल.

Web Title: Sridevi received for the first film, more honor than Rajinikanth