'या' साऊथ सुपरस्टारला ओळखलंत का? लेकीच्या सिनेमात साकारतोय 'मोइद्दीन'ची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:48 IST2023-05-08T14:47:21+5:302023-05-08T14:48:33+5:30

ब्लॅक शेड्स, डोक्यावर लाल टोपी आणि शेरवानी परिधान केलेला असा अभिनेत्याचा दमदार लुक दिसतोय.

south superstar rajnikanth will be seen as moideen bhai in daughters movie lal salam | 'या' साऊथ सुपरस्टारला ओळखलंत का? लेकीच्या सिनेमात साकारतोय 'मोइद्दीन'ची भूमिका

'या' साऊथ सुपरस्टारला ओळखलंत का? लेकीच्या सिनेमात साकारतोय 'मोइद्दीन'ची भूमिका

साऊथ सुपरस्टार 'थलायवा' रजनीकांत (Rajnikanth) यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajnikanth) तब्बल १५ वर्षांनी दिग्दर्शन क्षेत्रात कमबॅक करत आहे. तिचा 'लाल सलाम' या सिनेमाचा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रजनीकांत यांचा कॅमिओ असणार आहे. त्यांनी 'मोइद्दीन भाई' ही भूमिका साकारली आहे.  फिल्मच्या पोस्टरवरुन त्यांच्या लुकवरुन पडदा काढण्यात आला आहे. ब्लॅक शेड्स, डोक्यावर लाल टोपी आणि शेरवानी परिधान केलेला असा रजनीकांतचा दमदार लुक दिसतोय.

'लाल सलाम'चे चित्रीकरण सध्या जोरात सुरु आहे. काल रात्री फिल्मचे पोस्टर रिलीज करण्यात आले. रजनीकांतचा लुक बघून सगळेच  शॉक झालेत. या लुकमध्ये त्यांना ओळखणंही कठीण झालंय. मोइद्दिन भाईची भूमिका करण्या साठी ते खूपच उत्सुक आहेत.

ऐश्वर्या गेल्या काही महिन्यांपासून फिल्मच्या शूटमध्ये व्यस्त आहे. 'लाल समाम'मध्ये विष्णू विशाल आणि विक्रांत यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर रजनीकांत यांचा कॅमिओ आहे. 'मोइद्दीन भाई, स्वागत हा' असं कॅप्शन तिने दिलं  आहे. 

रजनीकांत याआधी २०२१ मध्ये 'दरबार' आणि 'अन्नात्थे' या सिनेमात दिसले होते.त्यांचा आगामी चित्रपट 'जेलर'चीही चाहते वाट बघत आहेत. 

Web Title: south superstar rajnikanth will be seen as moideen bhai in daughters movie lal salam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.