राजकीय पदयात्रेतच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेता कोमात; प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 15:59 IST2023-01-29T15:57:21+5:302023-01-29T15:59:21+5:30
शुक्रवारी एका राजकीय पदयात्रेदरम्यान अभिनेत्याला हार्टअटॅक आला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

राजकीय पदयात्रेतच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेता कोमात; प्रकृती चिंताजनक
दाक्षिणात्य अभिनेता नंदामुरी तारकरत्नची तब्येत अतिशय नाजूक आहे. सध्या तो कोमात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंगळुरुच्या नारायण इन्स्टिट्युट ऑफ कार्डियाक साइंसेस मध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी एका राजकीय पदयात्रेदरम्यान नंदामुरी याला हार्टअटॅक आला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, नंदामुरी यांची प्रकृती खूपच गंभीर आहे. ते सध्या कोमात असून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या त्याच्या भेटीसाठी कलाकार आणि अनेक राजकारणी सुद्धा दाखल होत आहेत.
#NandamuriTarakaRatna Health Update: Remains Critical. pic.twitter.com/fp9Z1auoWR
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) January 28, 2023
नंदामुरी तारकरत्न आणि अभिनेता ज्युनिअर एनटीआर हे चुलत भाऊ आहेत. ज्युनिअर एनटीआर यांच्या कुटुंबातील काही सदस्यही सध्या रुग्णालयात दाखल आहेत. नंदामुरी तारकरत्न हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव यांचे नातू आहेत.सध्या चाहते आणि कुटुंब त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत आणि प्रार्थना करत आहेत.