मलायका अरोरासोबत डेटिंगच्या चर्चा, निराश झाला अभिनेता; म्हणाला, "आम्ही मॉडेलिंगपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:38 IST2026-03-11T11:38:05+5:302026-03-11T11:38:38+5:30

मलायका सोराब बेदीसोबत रोमँटिक पोज देताना दिसली होती.

sorab bedi reacts on dating rumour with malaika arora feels disppointed | मलायका अरोरासोबत डेटिंगच्या चर्चा, निराश झाला अभिनेता; म्हणाला, "आम्ही मॉडेलिंगपासून..."

मलायका अरोरासोबत डेटिंगच्या चर्चा, निराश झाला अभिनेता; म्हणाला, "आम्ही मॉडेलिंगपासून..."

अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीतही डेटिंग लाईफमुळे चर्चेत असते. आधी मलायका-अर्जुन कपूर यांचं अफेअर चर्चेत होतं. दोघं अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नही करणार होते. मात्र दोन वर्षांपूर्व त्यांचं नातं तुटलं. यानंतर मलायका सतत एखाद्या मिस्ट्री मॅनसोबत दिसत होती. काही दिवसांपूर्वी तीएका कॉन्सर्टला हर्ष मेहता या तरुण व्यावसायिकासोबत दिसली. तर आता ती अभिनेता सोराब बेदीसोबत रोमँटिक पोज देताना दिसली. यावरुन मलायका आणि सोराब एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली. यावर आता सोराबनेच उत्तर दिलं आहे.

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सोराब बेदीने मलायकासोबतच्या अफेअरच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं आहे. या चर्चांवर निराशा व्यक्त करताना तो म्हणाला, "मलायका आणि माझं नाव जोडलं जाणं हे खूपच निराशाजनक आहे. आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. मॉडेलिंगच्या दिवसात माझ्या मेंटॉरने आमची मलायकाशी ओळख करुन दिली होती. नंतर आम्ही एकाच सोशल सर्कलचा भाग झालो. मलायकाला भेटलो, ती जिथे असायची त्या पार्टीही मी अटेंड केल्या आहेत. त्यामुळे आमच्यात मैत्री झाली."

तो पुढे म्हणाला, "डेलनाज दारुवाला आणि वाहबिज मेहताने मला रॅम्प वॉकची संधी दिली होती. मी त्यांच्यासोबत सोशल इव्हेंट्सला जायचो. मलायका आणि डेलनाज-वाहबिज हे आधीपासूनच घट्ट मित्र होते. तेव्हाच मी मलायकाला भेटलो होतो. पण आमच्यात मैत्रीशिवाय काहीच नाही. तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. पण आता ओळखतं म्हणूनच या पोस्ट व्हायरल होत आहेत. सध्याच्या अफवांमुळे मला खूप वाईट वाटलं आहे. लोक कसलीच पडताळणी न करता काहीही बोलतात. विशेषत: एखाद्या मुलीबद्दल किंवा महिलेबद्दल काहीही बोलताना २ वेळा विचार केला पाहिजे. यामुळे कोणाच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो."

सौरभ बेदी 'स्प्लिट्सव्हिला सीझन १६'चा स्पर्धक होता. याआधी तो 'दिलवाली दुल्हा ले जाएगी','चांद जलने लगा' सारख्या शोजमध्ये दिसला आहे.  तसंच निहारिका तिवारी ही सोराबची गर्लफ्रेंड आहे. मलायकासोबत नाव जोडल्याने सोराबने वैतागून तिच्यासोबतचे फोटोच डिलीट केले आहेत. 

Web Title : मलाइका अरोड़ा के साथ डेटिंग की अफवाहों पर अभिनेता ने दी सफाई।

Web Summary : अभिनेता सोराब बेदी ने मलाइका अरोड़ा के साथ डेटिंग की अफवाहों का खंडन किया है, और स्पष्ट किया कि वे मॉडलिंग के दिनों से सिर्फ दोस्त हैं। उन्होंने बिना जाँच की खबरों पर निराशा व्यक्त की और मानसिक स्वास्थ्य पर ध्यान देने के महत्व पर प्रकाश डाला।

Web Title : Actor Denies Dating Malaika Arora Amidst Relationship Rumors.

Web Summary : Actor Soarab Bedi refutes rumors of dating Malaika Arora, clarifying they are just friends from their modeling days. He expresses disappointment over the unverified reports and highlights the importance of considering mental health.