Sooryavanshi Trailer : मुंबई हिंदुस्तान का दिल...!! पाहा,अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा दमदार ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 14:33 IST2020-03-02T14:17:54+5:302020-03-02T14:33:18+5:30
Sooryavanshi Movie Trailer : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला.

Sooryavanshi Trailer : मुंबई हिंदुस्तान का दिल...!! पाहा,अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा दमदार ट्रेलर
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला. अक्षय कुमारची धमाकेदार अॅक्शन, कतरीनासोबतची त्याची रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि रणवीर सिंग व अजय देवगणची सरप्राईज एन्ट्री असा हा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर आहे.
ट्रेलरमध्ये ‘सूर्यवंशी’च्या कथेची झलक पाहायला मिळते. एटीएस अधिकारी असलेला अक्षय देशासाठी काहीही करू शकतो याचदरम्यान अक्षयला एका अज्ञात हल्ल्याबद्दल कळते. ट्रेलरच्या शेवटी रणवीर सिंगची एन्ट्री होते आणि यानंतर सिंघम अर्थात अजय देवगणही धमाकेदार एन्ट्री घेतो. ट्रेलरमधील अक्षयची अॅक्शन दमदार आहे. अक्षयला पुन्हा या रूपात पाहणे इंटरेस्टिंग आहे.
ट्रेलरमध्ये नीना गुप्ता, गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, जॅकी श्रॉफ यांचीही झलक पाहायला मिळते. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ट्रेलर लॉन्चला अक्षयची हटके एन्ट्री
Vroom! The Super Cop arrives in style! #SooryavanshiTrailer out today. #Sooryavanshi @akshaykumarpic.twitter.com/q06L8hP48G
— Reliance Entertainment (@RelianceEnt) March 2, 2020
आज ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अक्षय कुमारची एंट्री सुद्धा तेवढीच हटके आणि डॅशिंग होती. अक्षय कुमारने बाईकवरून त्याच्या वेगळ्या स्टाईलमध्ये एंट्री केली. या एन्ट्रीचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये रोहित शेट्टी, अक्षय कुमार, कतरीना कैफ शिवाय अजय देवगण अशा सर्वांनी हजेरी लावली. रणवीर सिंगही यावेळी हजर होता.