"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:52 IST2025-06-03T12:51:39+5:302025-06-03T12:52:10+5:30
सलमानच्या घरी कधीही... सूरजने सगळंच सांगितलं

"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट
'दबंग' अभिनेता सलमान खान (Salman Khan) बांद्रा बँडस्टँड येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो हे सर्वांनाच माहित आहे. सलमान अनेक वर्षांपासून इथे त्याच्या आईवडिलांसोबत राहत आहे. तसंच त्याचं घर अगदीच छोटं आहे. एवढा मोठा स्टार असून तो १ बीएचकेमध्ये राहतो. पहिल्या मजल्यावर तो एखा खोलीत राहतो तर त्याचे आईवडील वरच्या मजल्यावर राहतात. सलमानबद्दल आजपर्यंत चाहत्यांनी या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. मात्र आता अभिनेता सूरज पांचोलीने (Sooraj Pancholi) सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटबद्दल कोणालाही माहित नसलेल्या गोष्टी नुकत्याच शेअर केल्या आहेत.
आदित्य पांचोलींचा मुलगा सूरज पांचोलीला सलमान खाननेच इंडस्ट्रीत लाँच केलं. 'हिरो'या सिनेमातून त्याने आणि अथिया शेट्टीने पदार्पण केलं होतं. सूरजचा नुकताच 'केसरी वीर' सिनेमा रिलीज झाला. हाही सिनेमा सलमानने प्रमोट केला. नुकतंच एका मुलाखतीत सूरजने सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटचे काही गुपित सांगितले. इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "सलमानचं गॅलक्सीचं घर नेहमीच खुलं असतं. घराला कधीच लॉक नसतं. कधीही तुम्ही गेलात दर दरवाजा ढकलून आत जाऊ शकता. कोणत्याही वेळी जाऊ शकता. त्याच्या घरातलं फ्रीज उघडून तुम्ही खाऊही शकता. मी तसं केलेलं नाही पण हे त्याच्या घरी अगदीच नॉर्मल आहे. तो वापरत असलेलं प्रोटीन शेक बनवून पिऊ शकता. त्याचे अगदी व्हॅटिमिन्सही खाऊ शकता. राहिलेली बिर्यानी गरम करुन जेऊ शकता. कोणीही काहीही बोलणार नाही."
तो पुढे म्हणाला, "सलमान सकाळी उठल्यावर सर्वांना विचारेल काही खाल्लं का. आपापलं काम करेल. पुन्हा खोलीत जाऊन झोपेल. कोणाला डिस्टर्ब करणार नाही. त्याचं घर खरंतर खूप छोटं आहे. अनेक लोकांनी सांगितलंय जे खरं आहे की जेव्हा सलमानसाठी लंच किंवा डिनर घरुन पाठवलं जातं तेव्हा ते संपूर्ण युनिटसाठी असतं. कधीच त्याच्या एकट्यासाठी नसतं."