थिएटरमध्ये प्रेक्षकांनी पाठ फिरवलेला सोनू सूदचा 'फतेह' सिनेमा ओटीटीवर रिलीज; कुठे पाहता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:44 IST2025-03-07T16:44:07+5:302025-03-07T16:44:36+5:30

सोनू सूदचा अॅक्शन सिनेमा 'फतेह' आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. जाणून घ्या सविस्तर (fateh)

sonu sood movie fateh ott release details inside jiohotstar | थिएटरमध्ये प्रेक्षकांनी पाठ फिरवलेला सोनू सूदचा 'फतेह' सिनेमा ओटीटीवर रिलीज; कुठे पाहता येईल?

थिएटरमध्ये प्रेक्षकांनी पाठ फिरवलेला सोनू सूदचा 'फतेह' सिनेमा ओटीटीवर रिलीज; कुठे पाहता येईल?

सोनू सूदची (sonu sood) भूमिका असलेला 'फतेह' सिनेमा यावर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला होता. अर्थात १० जानेवारी २०२५ ला 'फतेह' सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला होता. सोनूने स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची चांगलीच उत्सुकता होती. पण सिनेमाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने अवघ्या १३ कोटींची कमाई केली. अखेर ज्यांना 'फतेह' सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 'फतेह' आता ओटीटीवर रिलीज झालाय.

'फतेह' सिनेमा ओटीटीवर रिलीज

सोनू सूदची (sonu sood) भूमिका असलेला 'फतेह' (fateh movie) सिनेमा आजपासून जिओहॉटस्टारवर बघायला मिळणार आहे. सोनू सूदने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा पाहता आला नाही त्यांना 'फतेह' सिनेमा आता ऑनलाईन घरबसल्या सहकुटुंब पाहायला मिळणार आहे. सोनू सूदच्या चाहत्यांना या वीकेंडमध्ये त्याच्या लाडक्या कलाकाराचा सिनेमा घरबसल्या पाहण्याचं सुख निश्चितच मिळेल.

'फतेह' सिनेमाविषयी

'फतेह' हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन आहे. सिनेमाच्या ट्रेलरपासूनच हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता होती. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला अॅक्शन आणि फायटिंगच्या बाबतीत कडक टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सिनेमा रिलीज झाल्यावर मात्र या सिनेमाला अपेक्षित यश मिळवता आले नाही.

Web Title: sonu sood movie fateh ott release details inside jiohotstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.