सोनू सूदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'फतेह' सिनेमाचं पोस्टर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 07:03 PM2024-03-15T19:03:00+5:302024-03-15T19:03:51+5:30

सोनू सूद पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sonu Sood Drops Poster Of Fateh And Teaser Of Movie To Be Out On Saturday Know Details | सोनू सूदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'फतेह' सिनेमाचं पोस्टर आऊट!

सोनू सूदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'फतेह' सिनेमाचं पोस्टर आऊट!

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून त्याच्या जनसेवेसाठी ओळखला जात आहे.  सोनू सूद पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनू सूद लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच सोनू सूदने चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर रीलिज केलं आहे.  यासोबतच चित्रपटाचा टीझर रिलीज होण्याची तारीखही समोर आली आहे. 

सोनू सूदनं इंस्टाग्राम अकाउंटवरून 'फतेह'चं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. सायबर क्राईम थ्रिलरमध्ये सोनू एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यासोबतच सोनू सूदने कॅप्शन लिहिले आहे की, 'कधीही कुणाला कमी लेखू नका! 'फतेह' सह पॉवर-पॅक ॲक्शनसाठी सज्ज व्हा. या चित्रपटाचा टीझर उद्या शनिवारी प्रदर्शित होणार आहे. 

'फतेह'  चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले आहे. ज्यांनी यापूर्वी 'बाजीराव मस्तानी' आणि 'शमशेरा' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटात ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. हॉलिवूड स्टंट स्पेशालिस्ट ली व्हिटेकर यांच्या देखरेखीखाली ॲक्शन सीन्स करण्यात आले आहेत.
 

Web Title: Sonu Sood Drops Poster Of Fateh And Teaser Of Movie To Be Out On Saturday Know Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.