हा तोच चिमुकला! सोनू निगमच्या लेकाचं दोन वर्षात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; कौतुक करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:27 IST2025-02-27T11:26:07+5:302025-02-27T11:27:08+5:30
सोनू निगमच्या लेकाला ओळखलंत का? आपल्या गोड आवाजात 'अभी मुझमे कही..' गाणारा हा तोच चिमुकला

हा तोच चिमुकला! सोनू निगमच्या लेकाचं दोन वर्षात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; कौतुक करत म्हणाला...
लोकप्रिय गायक सोनू निगमला (Sonu Nigam) निवान (Nevaan Nigam) हा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चिमुकल्या निवानचा 'अभी मुझ मे कही' गाणं म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोनू निगमच्या कडेवर बसून स्टेजवर त्याने अगदी आत्मविश्वासाने त्याच्या गोड आवाजात गाणं म्हटलं होतं. नंतर निवान कुठे फारसा दिसलाच नाही. आता नुकतंच सोनू निगमने लेकाचे दोन फोटो शेअर केलेत. यामध्ये निवानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच त्याचं कौतुक करत आहेत.
सोनू निगमचा लोक निवान निगम १८ वर्षांचा झाला आहे. तसंच आता त्याने इन्स्टाग्रामवरही आला आहे. त्याने आपला पहिलाच फोटो फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा शेअर केला आहे. २ वर्षात त्याने हे स्वत:मध्ये एवढा मोठा बदल घडवून आणला आहे. बेढब शरिरावरुन तो आता एकदम फिट झाला असून आणि अॅब्स दाखवत आहे. जिममधीलही फोटो त्याने शेअर केलेत.
सोनू निगमनेही लेकाचे फोटो पोस्ट करत लिहिले, "देव तुला कायम त्याच्या छत्रछायेत ठेवो बेटा. मी तुला फक्त आशीर्वाद देऊ शकतो. तुझ्या पहिल्याच पोस्टसाठी अभिनंदन."
बापलेकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत निवानचं कौतुक केलं आहे. निवानने या ट्रान्सफॉर्मेशनसाठी टायगर श्रॉफकडून प्रेरणा घेतली. टायगरनेही कमेंट करत त्याला प्रोत्साहन दिलं आहे.