आमच्या प्रेमासाठी सर्व एकत्र आले अन्..; लग्नाचे फोटो शेअर करत सोनाक्षीने पहिल्यांदाच भावना सांगितल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:41 IST2024-06-25T15:39:50+5:302024-06-25T15:41:25+5:30

सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर जहीर इक्बालसोबत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनच्या माध्यमातून मनातल्या भावना सांगितल्या (sonakshi sinha)

Sonakshi sinha shared her wedding photos with zaheer iqqbal and express her feelings | आमच्या प्रेमासाठी सर्व एकत्र आले अन्..; लग्नाचे फोटो शेअर करत सोनाक्षीने पहिल्यांदाच भावना सांगितल्या

आमच्या प्रेमासाठी सर्व एकत्र आले अन्..; लग्नाचे फोटो शेअर करत सोनाक्षीने पहिल्यांदाच भावना सांगितल्या

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रविवारी २३ जूनला तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबतलग्न केलं. सोनाक्षी आणि जहीरने नोंदणी पद्धतीने एकमेकांशी विवाह केला. लग्नानंतर या दोघांनी जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसाठी शानदार रिसेप्शन पार्टी आयोजित केली. सोनाक्षीने लग्नानंतर रात्री रिसेप्शन पार्टीमध्ये लाल रंगाची साडी आणि कपाळी कुंकू असा खास पारंपरिक पोशाख परिधान केला होता. सोनाक्षी सिन्हाने हेच फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या मनातल्या भावना सांगितल्या.

हा एक दैवी चमत्कार: सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाने लग्नात लाल रंगाच्या साडीवर जहीरसोबत जे रोमँटिक फोटोशूट केलं ते सोशल मीडियावर पोस्ट करुन कॅप्शन लिहिलंय की, "काय दिवस होता! प्रेम, हास्य, बांधिलकी, उत्साह आणि भावपूर्ण असा दिवस होता. आमच्या प्रत्येक मित्राने, कुटुंबाने आणि टीमने आम्हाला पाठिंबा दिला. जणू हे सर्व विश्व प्रेमात असलेल्या दोन लोकांना जोडण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी आम्हा दोघांसाठी सुरुवातीपासून याच गोष्टीची अपेक्षा केली होती. सर्वजण फक्त प्रेमासाठी एकत्र आले. हा जर दैवी चमत्कार नसेल तर मला माहित नाही हे काय आहे. आयुष्यात आम्ही दोघे एकत्र आलो आहोत याशिवाय आम्हाला जे प्रेम मिळालंय यासाठी आम्ही खूप धन्य झालो आहोत."

सोनाक्षी - जहीरचं लग्नाची धामधूम

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी रविवारी (२३ जून) लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग रिसेप्शन मुंबईत पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी सोनाक्षीच्या लग्नाला हजर होते. सर्वांनी सोनाक्षीला भरभरुन प्रेम आणि आशिर्वाद दिले.

Web Title: Sonakshi sinha shared her wedding photos with zaheer iqqbal and express her feelings