सिंहाची गर्जना ऐकून सोनाक्षी सिन्हा आणि जहीरची उडाली झोप, Video शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:27 IST2024-12-30T14:00:05+5:302024-12-30T14:27:46+5:30

सोनाक्षी सिन्हाच्या खोलीबाहेर चक्क सिंहाने गर्जना केली. याचा एक व्हिडीओ तिनं शेअर केलाय.

Sonakshi Sinha On Holiday In Australia With Husband Zaheer Iqbal Lion Appears At Their Bedroom Window Watch Video | सिंहाची गर्जना ऐकून सोनाक्षी सिन्हा आणि जहीरची उडाली झोप, Video शेअर करत म्हणाली...

सिंहाची गर्जना ऐकून सोनाक्षी सिन्हा आणि जहीरची उडाली झोप, Video शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल हे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दोघे चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसून येतात. हे कुल आणि फनी जोडपं आता नेटकऱ्याचं आवडतं  बनलं आहे. नुकतंच सोनाक्षी आणि जहीर हे ऑस्ट्रेलियामध्ये व्हेकेशनवर आहेत. या टूरमधील एक व्हिडीओ सोनाक्षीनं चाहत्यांसोबत शेअर केलाय. 

 सोनाक्षी आणि जहीर हे ऑस्ट्रेलियातील कॅनबेरामध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहे.  सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती काचेच्या घरातील बेडवर ब्लँकेटमध्ये बसलेली दिसतेय. तर तिच्या बेडरूमच्या बाहेर थेट सिंह उभा असून तो गर्जना करताना दिसतोय. सिंहाची गर्जना सोनाक्षीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. याचा व्हिडीओ तिचा पतीन जहीरनं बनवला.  हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता सहा महिने पूर्ण झाली आहेत. लग्न झाल्यापासून सोनाक्षी आणि तिचा पती कधी अमेरिका तर कधी इटली अशा वेगवेगळ्या देशात जाताना दिसत आहे.  दरम्यान, सोनाक्षीने आंतरधर्मीय विवाह केल्याने खूप टीका झाली होती. अजूनही तिच्या लग्नावरुन चर्चा सुरु असते. पण, जहीर आणि सोनाक्षी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या सुखी संसाराचा आनंद लुटत आहेत. 

Web Title: Sonakshi Sinha On Holiday In Australia With Husband Zaheer Iqbal Lion Appears At Their Bedroom Window Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.