जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:32 IST2025-06-26T13:32:15+5:302025-06-26T13:32:59+5:30

'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज झाला असून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार सिनेमा?

Son of Sardaar 2 teaser starring ajay devgn mukul dev ravi kishan sanjay mishra | जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

२०१२ साली आलेल्या  'सन ऑफ सरदार' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. या सिनेमातील कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. शिवाय अजय देवगणच्या अभिनयाचंही कौतुक झालं. आता १३ वर्षांनी  'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सिक्वल अर्थात  'सन ऑफ सरदार २' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून सिनेमाचा खास व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अजय देवगणची कॉमेडी आणि अॅक्शन सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.  

जस्सी पाजी इज बॅक

'सन ऑफ सरदार २'चा पहिला लूक प्रदर्शित झाल्यापासून, हे स्पष्ट झाले की, हा फक्त सिक्वल नाही तर संपूर्णतः एक नवीन सिनेमा आहे. 'सन ऑफ सरदार २'चा जो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, त्यामध्ये लिहिलंय की, पंजाबमध्ये सुखरुप वाचला पण आता स्कॉटलंडमध्ये स्वतःचा जीव वाचवणार का? अशाप्रकारे 'सन ऑफ सरदार २' सिनेमा यावेळी स्कॉटलंडमध्ये घडत आहे. पुन्हा एकदा या सीक्वलमध्ये टोनी आणि टिट्टो या भावंडांची जोडी पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आहे. 'सन ऑफ सरदार २' विषयी उत्सुकता यामुळे शिगेला पोहोचली आहे.

कधी रिलीज होणार 'सन ऑफ सरदार २'?

विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, रवी किशन, संजय मिश्रा, मृणाल ठाकूर, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोब्रियाल, विंदू दारा सिंग, रोशनी वालिया, शरत सक्सेना, साहिल मेहता आणि दिवंगत मुकुल देव यांच्यासारख्या दमदार स्टारकास्टचा समावेश आहे.  जिओ स्टुडिओज आणि देवगण फिल्म्स, ए देवगण फिल्म्स आणि एसओएस २ लिमिटेड निर्मित, सन ऑफ सरदार २ ची निर्मिती अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.

Web Title: Son of Sardaar 2 teaser starring ajay devgn mukul dev ravi kishan sanjay mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.