Vidya Balan: सोज्वळ विद्या बालनचं बोल्ड फोटोशूट, एकही कपडा न घालता दाखवल्या हॉट अदा, चाहते अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:47 IST2023-03-07T16:46:23+5:302023-03-07T16:47:44+5:30
Vidya Balan bold photo shoot: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Vidya Balan: सोज्वळ विद्या बालनचं बोल्ड फोटोशूट, एकही कपडा न घालता दाखवल्या हॉट अदा, चाहते अवाक्
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. विद्या बालन ही नेहमी गमतीदार रिल्स शेअर करत असते. ते खूप व्हायरलही होत असतात. दरम्यान, हल्लीच विद्या बालनचा असा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो पाहून चाहते अवाक झाले.
त्याचं झालं असं की, विद्या बालनने प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्यासोबत एक फोटोशूट केलं. त्यामध्ये विद्या विना कपड्यात हातात पेपर घेऊन पोझ देताना दिसत आहे. विद्याचा हा फोटो डब्बूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये विद्या कॉफी टेबलवर कुठलेही कपडे न घालता पेपरने आपलं शरीर झाकत कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. तिने एका हातामध्ये चहाचा कप घेतला आहे, तर डोळ्यांवर काळा चष्मा लावला आहे. तिने मोकळे कुरळे केस आणि ग्लोसी मेकअपद्वारे आपला लूक कंप्लिट केला आहे. तर विद्याच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर विद्याचे फॅन्सही अवाक् झाले आहेत.
डब्बूच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युझरनं विद्याचं कौतुक करत लिहिलं की, फायर, तक अन्य एका युझरनं लिहिलं की, खूप चांगला फोटो आहे. मात्र काही लोकांना विद्याचा हा लूक अजिबातच आवडलेला नाही. त्यांनी विद्याविरोधात नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं लिहिलं की अडल्ट चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. तर एकाने लिहिले की, फोटोशूटसाठी किमान कपडे तरी परिधान करू द्यायला हवे होते. विद्या बालन सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र लवकरच ती काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.