सना खानसोबत तुलना होताच भडकली सोफिया हयात; म्हणाली, तुम्ही ढोंगी आहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 14:47 IST2020-11-24T14:45:18+5:302020-11-24T14:47:44+5:30
सना लवकरच सोफियाच्या मार्गावर येणार,अशा कमेंट ऐकल्यानंतर तर सोफियाचा पारा चढला.

सना खानसोबत तुलना होताच भडकली सोफिया हयात; म्हणाली, तुम्ही ढोंगी आहात
‘बिग बॉस’ फेम सना खान सध्या तिच्या ‘निकाह’मुळे चर्चेत आहे. त्याआधी अचानक ग्लॅमर इंडस्ट्री सोडत असल्याची घोषणा करून ती चर्चेत आली आहे. अल्लाहच्या मार्गावर चालत मानवतेची सेवा करण्यासाठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते. यानंतर सोशल मीडियावरचे स्वत:चे सगळे बोल्ड फोटोही डिलीट केले होते. याच सना खानने काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मौलाना मुफ्ती अनससोबत गुपचूप ‘निकाह’ केला. काहीसे असेच काही वर्षांपूर्वी सोफिया हयातने केले होते. साहजिकच सनाची तुलना सोफियासोबत होणार. पण या तुलनेने सोफिया हयात जाम भडकली आहे.
सना लवकरच सोफियाच्या मार्गावर येणार,अशा कमेंट ऐकल्यानंतर तर तिचा पारा आणखी चढला. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने ही भडास काढली. सना खानसोबतच्या माझ्या तुलनेने मी वैतागली आहे. कपड्यांचा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही, हे लोकांना कळत नाही. मी ननसारखे कपडे घालत नाही म्हणून काय मी ननपेक्षा कमी अध्यात्मिक ठरते? संकुचित विचारांच्या लोकांना हेच कळत नाही. मी आजही मदर सोफिया आहे, असे सोफिया म्हणाली.
यावेळी तिने सना खानचीही बाजू उचलून धरली. सनाला जे करायचे होते, ते तिने केले. कृपया तिला एकटे सोडा. तुमच्यापैकी अनेकजण असे आहेत, जे मंदिरात जाताना डोकं झाकून घेतात आणि मंदिरातून बाहेर पडतात डोक्यावरचा कापड दूर फेकतात. तुम्ही ढोंगी आहात, असे ती म्हणाली.
2016 साली सोफियाने अचानक ग्लॅमर वर्ल्ड सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर ती काही दिवस ननच्या पोशाखात वावरत होती. इतकेच नाही तर गाइया सोफिया मदर असे नवे नामकरणही केले होते. मात्र काही महिन्यांनी ती पुन्हा ग्लॅमर वर्ल्डमध्ये परतली. ननचा पोशाख त्याग करत, सोशल मीडियावर तिने स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणे सुरु केले.
‘अल्लाह’साठी सिनेसृष्टी सोडणाऱ्या सना खानने मौलवींशी गूपचूप केला ‘निकाह’, व्हिडीओ व्हायरल
सना खानने शेअर केला ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो, म्हणून मुफ्ती अनससोबत केला ‘निकाह’