sana khan posts wedding picture after marriage with mufti anas |  सना खानने शेअर केला ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो, म्हणून मुफ्ती अनससोबत केला ‘निकाह’

 सना खानने शेअर केला ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो, म्हणून मुफ्ती अनससोबत केला ‘निकाह’

ठळक मुद्देसना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये 'यही है हाय सोसायटी' या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती.

‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकणारी अभिनेत्री सना खान हिने गुपचूप ‘निकाह’ केला आणि तिच्या ‘निकाह’ची बातमी ऐकून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. 20 नोव्हेंबरला सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला. यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता खुद्द सनाने ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. शिवाय ‘निकाह’ का व कशासाठी केले, हेही तिने सांगितले.
एकमेकांवर प्रेम केले अल्लाहसाठी... एकमेकांसोबत ‘निकाह’ केला अल्लाहसाठी... या जन्मात अल्लाहचा आशिर्वाद आम्हाला एकत्र ठेवेल आणि स्वर्गात पुन्हा आम्ही एकमेकांना भेटू ..., असे या फोटोसोबत सनाने लिहिले आहे.

 सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते.

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये 'यही है हाय सोसायटी' या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या  शोमध्ये सुद्धा ती झळकली होती.
  

अल्लाहसाठी घेतला सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय
‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता. पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का?  जे  निराधार, अनाथ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृत्यू कधीही गाठू शकतो आणि मेल्यानंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय.  विशेषत:  मरणानंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे.
 त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार,’असे लिहित तिने आपला निर्णय जगाला कळवला होता.

‘अल्लाह’साठी सिनेसृष्टी सोडणाऱ्या सना खानने मौलवींशी गूपचूप केला ‘निकाह’, व्हिडीओ व्हायरल


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sana khan posts wedding picture after marriage with mufti anas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.