ठळक मुद्देयाच वर्षाच्या सुरुवातीला सना खानचे बॉयफ्रेन्ड मेलविन लुईससोबत ब्रेकअप झाले होते. यावेळी तिने मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते.

अल्लाह के रास्ते से भटक गई थी... असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडले होते. यानंतर बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री सना खान हिने ‘अल्लाह’साठी अभिनय सोडला होता.  अल्लाह माझ्या या नव्या प्रवासात मला मदत करेल... मी अल्लाहच्या आदेशांचे पालन करेल, असे लिहित  सिनेसृष्टीतून संन्यास घेत असल्याचे सनाने जाहिर केले होते. हिच सना आता लग्नामुळे चर्चेत आहे  सना खानने शुक्रवारी रात्री मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला.  
सनाच्या या ‘निकाह’चे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सना व मुफ्ती अनस व्हाईट कलरच्या पोशाखात आहेत. एका व्हिडीओत सना केक कापताना दिसतेय. 

  

अल्लाहसाठी घेतला सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय
‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता. पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का?  जे  निराधार, अनाथ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृत्यू कधीही गाठू शकतो आणि मेल्यानंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय.  विशेषत:  मरणानंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे.

त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार,’असे लिहित तिने आपला निर्णय जगाला कळवला होता.

कोण आहे सना खान?
सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये 'यही है हाय सोसायटी' या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या रिअ?ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती झळकली होती.

झाले होते ब्रेकअप

याच वर्षाच्या सुरुवातीला सना खानचे बॉयफ्रेन्ड मेलविन लुईससोबत ब्रेकअप झाले होते. यावेळी तिने मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते. त्याच्या बद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. आता या सर्व जुन्या पोस्ट तिने तिच्या अकाऊंटवरून डिलीट केल्या आहेत. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

‘अल्लाह’ मला माझ्या प्रवासात मदत करेन...! अभिनेत्री सना खानचा बॉलिवूड संन्यास 

-आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jai ho actor and bigg boss 6 contestant sana khan has tied the knot with surat based mufti-anaas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.