-आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:04 AM2020-02-28T11:04:12+5:302020-02-28T11:05:08+5:30

प्रेम रंग... प्रेम भंग...

Sana Khan wept bitterly on stage during promotion, video viral-ram | -आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

-आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देसना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सना खान तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. होय, डॉन्स ट्रेनर मेल्विन लुईसला सना डेट करत होती. खुद्द सनाने याची कबुली दिली होती. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. पण अचानक सना व लुईसचे ब्रेकअप झाले. पण या बे्रकअपचे दु:ख पचवणे सनाला जड जातेय. काल एका इव्हेंटमध्ये हे पाहायला मिळाले. होय, या इव्हेंटमध्ये सना ढसाढसा रडताना दिसली.
 तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. आगामी वेब सीरिजच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सनाने हजेरी लावली. त्यावेळी मीडियाशी बोलताना  तिला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत आणि ती सर्वांसमोर ढसाढसा रडू लागली.

स्वत:ला सांभाळण्याचा तिने खूप प्रयत्न केला पण तिला ते शक्य झाले नाही. सहकारी कलाकारांच्या मागे जावून ती आपले अश्रू पुसताना दिसली.  यावेळी इव्हेंटच्या अँकरने   परिस्थिती सांभळली आणि आयुष्यात काही गोष्टी घडतात. पण ठिक आहे, शेवटी आपण माणसं आहोत, असे अँकरने म्हटले. त्यानंतर सनाने कसेबसे स्वत:ला सांभाळले. सना स्टेजवर रडत असताना तिचे चाहते मात्र तिच्या पाठीशी उभे राहिले. सर्वजण टाळ्या वाजवून तिला चिअरअप करताना दिसले.

काही दिवसांपूर्वी सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ब्रेकअपचे कारण सांगितले होते. याशिवाय तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर सुद्धा एक पोस्ट शेअर केली होती. ‘त्याच्यामुळे त्याची एक विद्यार्थिनी प्रेग्नन्ट होती, हे मला कळले तेव्हा मला प्रचंड दु:ख झाले. माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. तो त्याच्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करत असे. त्याच्या याच सवयीमुळे तो अद्यापही स्ट्रगल करतोय. शेवटी देव शिक्षा देतोच,’असे तिने म्हटले होते.


सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Sana Khan wept bitterly on stage during promotion, video viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.