लवकरच भेटू चॅम्पियन...! लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:34 IST2025-12-04T11:33:55+5:302025-12-04T11:34:43+5:30
स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीने पोस्ट करत लिहिले...

लवकरच भेटू चॅम्पियन...! लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीची पोस्ट
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची जितकी चर्चा होती तितकीच आता लग्न पुढे ढकलल्याची आहे. आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली नंतर पलाशलाही रुग्णालयात दाखल केलं. मग अचानक पलाशने स्मृतीचा विश्वासघात केल्याची बातमी आली. दरम्यान स्मृती पलाशचं लग्न सांगलीमध्ये ग्रँड पद्धतीने होणार होतं. मेहंदी, संगीत, हळद हे फंक्शन्सही वाजत गाजत झाले होते. त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग करणाऱ्या कंपनीने २४ नोव्हेंबर रोजीच एक पोस्ट केली होती जी आता व्हायरल होत आहे.
स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीने पोस्ट करत लिहिले, "आयुष्यातल्या प्रत्येक सामन्यात आपण फिनिश लाईन क्रॉस करतोच असं नाही. पण शेवटी खेळाडू वृत्तीच महत्वाची असते. आमच्या टीमने आनंदाने आणि अभिमानाने खूप मेहनत केली. सर्वांचंच नाव घेण्यासाठी ते पात्र आहेत. चॅम्पियन आपण लवकरच भेटू."

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. यानंतर सगळीकडे स्मृतीच्या लग्नाची चर्चा होती. पलाशने तिला स्टेडियमवर घेऊन जात फिल्मी स्टाईलने प्रपोजही केले होते. सांगली येथे त्यांच्या लग्नसोहळ्याला थाटात सुरुवात झाली होती. मात्र अचानक काही गोष्टी घडल्या आणि लग्न पुढे ढकलाव लागलं आहे. दोघंही आता कधी लग्न करणार यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे.