वयाने मोठ्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला गायक अरमान मलिक, 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:38 IST2025-01-03T11:36:55+5:302025-01-03T11:38:22+5:30
अरमानची बायको नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

वयाने मोठ्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला गायक अरमान मलिक, 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
प्रसिद्ध गायक अरमान मलिक याने त्याच्या गर्लफ्रेडसोबत विवाह केला आहे. या जोडप्यानं २८ ऑगस्ट २०२३ रोजी साखरपूडा केला होता. त्यानंतर आता २ जानेवारी २०२५ रोजी दोघांनीही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात केली. दोघांवार शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे. दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अरमानची बायको नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अरमान मलिक याच्या पत्नीचं नाव हे आशना श्रॉफ असं आहे. हे दोघे २०१७ पासून एकमेकांच्या प्रेमात होते आणि डेट करत होते. अरमान मलिकपेक्षा आशना वयाने मोठी आहे. अरमान २९ वर्षांचा असून आशना ३१ वर्षांची आहे. मात्र वयाचे बंधन झुगारून दोघांनी आपले प्रेम खरे केले आणि अखेर लग्नही केले. आशनाचा जन्म मुंबईत ४ ऑगस्ट १९९३ रोजी एका सिंधी कुटुंबात झाला. तिने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर त्यानंतर लंडनमधून फॅशनमध्ये पदवी मिळवली. फॅशन व्यतिरिक्त तिने इंटिरियर डिझायनिंग आणि फोटोग्राफीमध्येही पदवी मिळवली.
रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीपासूनच फॅशनमध्ये रुची असलेली आशना ही प्री-स्कूल टीचर होती. २०१३ मध्ये तिने फॅशनच्या आवडीनुसार नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ब्लॉगिंग सुरू केले. आशनाने स्वतःचे YouTube चॅनल आहे. ज्यावर ती सौंदर्य, फॅशन आणि प्रवासाचे व्हिडीओ पोस्ट करते. तिच्या चाहत्यांची मोठी यादी आहे. विशेष म्हणजे ती स्वतःचे ऑनलाइन फॅशन स्टोअर देखील चालवते. याशिवाय तिचे अनेक मोठ्या फॅशन ब्रँड्सशी सहकार्य आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये आहे.