"या निर्दयी दुनियेत..."; गायनातून निवृत्ती घेतलेल्या अरिजीत सिंहची आणखी एक पोस्ट, चाहत्यांना काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:54 IST2026-02-25T10:52:10+5:302026-02-25T10:54:02+5:30

बॉलिवूडचा 'म्युझिक किंग' मानल्या जाणाऱ्या अरिजीत सिंगने महिनाभरापूर्वीच पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. आता त्याने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला असून, एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

singer arijit singh post after retirement to appeal with fans of pending work of his songs | "या निर्दयी दुनियेत..."; गायनातून निवृत्ती घेतलेल्या अरिजीत सिंहची आणखी एक पोस्ट, चाहत्यांना काय म्हणाला?

"या निर्दयी दुनियेत..."; गायनातून निवृत्ती घेतलेल्या अरिजीत सिंहची आणखी एक पोस्ट, चाहत्यांना काय म्हणाला?

बॉलिवूडचा 'म्युझिक किंग' मानल्या जाणाऱ्या अरिजीत सिंगने महिनाभरापूर्वीच पार्श्वगायनातून (Playback Singing) निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. आता त्याने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला असून, एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. "या निर्दयी जगात तुमच्या प्रेमाबद्दल आभार, पुढे काय होईल कोणास ठाऊक," असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

"पुढे काय होईल, कोणास ठाऊक"

२४ फेब्रुवारी रोजी अरिजितने आपल्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवर एक लांबलचक नोट लिहिली. त्याने सुरुवातीलाच स्पष्ट केले की, हा मेसेज फक्त त्याची गाणी ऐकणाऱ्या खऱ्या चाहत्यांसाठी आहे. अरिजित म्हणाला, "नमस्कार माझ्या प्रिय चाहत्यांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. या निर्दयी जगामध्ये तुम्ही दाखवलेल्या प्रेम आणि नम्रतेबद्दल मी तुमचा आभारी आहे. जरी मी नवीन गाणी घेणे थांबवले असले, तरी अनेक गाणी पेंडिंग आहेत, जी मला पूर्ण करायची आहेत."

चाहत्यांना दिलासा देताना अरिजितने सांगितले की, त्याची अनेक गाणी अजून रिलीज व्हायची आहेत, जी कदाचित पुढील संपूर्ण वर्षभर किंवा २०२७ पर्यंत एक-एक करून प्रदर्शित होत राहतील. अनेक अपूर्ण गाणी आहेत जी पूर्ण होईपर्यंत येत राहतील. शांत राहा. स्वतःला वेळ द्या, वाचन करा, ध्यान करा आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मपासून थोडे दूर राहण्याचा प्रयत्न करा," असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला आहे.

२७ जानेवारीला घेतली होती निवृत्ती

अरिजीतने २७ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने म्हटले होते की, पार्श्वगायक म्हणून त्याचा प्रवास आता इथेच संपत आहे. त्याने करिअरच्या शिखरावर असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातील त्याचे चाहते निराश झाले होते. 'आशिकी २' मधील 'तुम ही हो' या गाण्यापासून जगप्रसिद्ध झालेल्या अरिजीत सिंगने आपल्या गायनाने करोडो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. आता त्याच्या पेंडिंग गाण्यांची प्रतीक्षा चाहत्यांना असून, त्याने भविष्याबद्दल केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Web Title : अरिजीत सिंह का विदाई संदेश: संगीत से संन्यास पर आभार और अनिश्चितता।

Web Summary : अरिजीत सिंह ने पार्श्व गायन से संन्यास की घोषणा के बाद, प्रशंसकों को उनके प्यार के लिए धन्यवाद दिया। उन्होंने कहा कि उनके कुछ गाने 2027 तक रिलीज़ होंगे, और प्रशंसकों को भविष्य के बारे में अनिश्चितता के बीच कल्याण को प्राथमिकता देने का आग्रह किया।

Web Title : Arijit Singh's retirement post: Gratitude and uncertainty in music farewell.

Web Summary : Arijit Singh, after announcing his playback singing retirement, shared a heartfelt message thanking fans for their love. He mentioned pending songs will release through 2027, urging fans to prioritize well-being amidst uncertainty about the future.